केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचा आढावा
आंबेडकरी चळवळीतील महत्वपूर्ण सिद्धार्थ विहार वसतिगृह पुन्हा नव्याने सुसज्ज उभे करण्यासाठी 78 कोटींच्या निधीची तरतूद
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणाऱ्या बैठकीचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल येथे करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे; सहसचिव दिनेश डिंगळे; आदी अनेक शासकीय अधिकारी मान्यवर उपस्थित होते.
आंबेडकरी चळवळीच्या अनेक स्थित्यंतराचे ऐतिहासिक साक्षीदार असणाऱ्या वडाळा येथील सिद्धार्थ विहार वसतिगृहाचे आंबेडकरी चळवळीत महत्वाचे स्थान आहे. या ऐतिहसिक सिध्दार्थ विहार वसतिगृहाची पुन्हा अत्याधुनिक सुसज्ज उभारणी करण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विविद्यार्ट्झनभागातर्फे 78 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण पूर्ण करुन नोकरी मिळवून मुंबईत स्वतःचे घर घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वसतिगृहातून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी या वसतीगृहात वर्किंग मेन हॉस्टेल म्हणून 20 खोल्या आरक्षित ठेवण्यात येणार आहे. 9माजल्यांच्या या वसतिगृहात मेडिटेशन हॉल सुद्धा असेल.हे वसतिगृह येत्या 3 वर्षात उभे राहिल त्या दृष्टीने लवकरात लवकर बांधकाम सुरू करण्याचे निर्देश केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रालयाला केंद्र सरकार तर्फे दरवर्षी 4 हजार 101 कोटी चे बजेट मिळते आणि महाराष्ट्र राज्याचे 16 हजार 494 कोटी असे मिळून राज्याचे सामाजिक न्याय मंत्रालयाचे एकूण बजेट 20 हजार 595 कोटी इतके आहे. बार्टी चे बजेट 350 कोटी चे आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेतून मदत देण्यासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मासिक 1 हजार मिळणारी पेन्शन मध्ये वाढ करून मासिक 1 हजार 500 देण्यात यावेत अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना केली. राज्यात 41 लाख ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळते.
बौद्धजन पंचायत समिती सभागृहाला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 25 कोटी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करून लवकर काम मार्गी लावण्याच्या सूचना ना.रामदास आठवले यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बौद्धजन पंचायत समिती चे गट प्रतिनिधी आणि रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; नागसेन कांबळे; लोजपा चे रवी गरुड; रिपाइं चे प्रकाश जाधव; रमेश गायकवाड; विनोद निकाळजे; सचिनभाई मोहिते; दयाळ बहादूर; अशोक भालेराव; चंद्रशेखर कांबळे; घनश्याम चिरणकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.