रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची उद्या दि.27 मे रोजी शिर्डी मध्ये महत्वपूर्ण बैठक
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची महत्वपूर्ण बैठक येत्या दि.27 मे रोजी सकाळी 11.30 वाजता शिर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीचे अध्यक्षस्थान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले भूषविणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या शिर्डी मधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे नागालँड मधील नव निर्वाचित दोन्ही आमदार उपस्थित राहणार आहेत.
शिर्डी मधील हॉटेल पॅलेस मधील सभागृहात आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठकीला देशभरातील 28 राज्यांचे आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांचे रिपाइं चे प्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे संघटन काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व राज्यांमध्ये स्थापन करण्यात पक्षाध्यक्ष ना.रामदास आठवले यांना यश आलेले असून देशभरातील सर्व राज्यांचे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.