अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी
प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी घेतली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट
मुंबई :दिनांक 14
नांदेड जिल्ह्यातील बोंढार या गावांमध्ये दिनांक 1 जून रोजी जातीय द्वेषभावनेतून घडलेल्या अक्षय भालेराव हत्याकांडाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा .जोगेंद्र कवाडे यांनी दिनांक 14 जून रोजी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.
1जून रोजी बोंढार या गावांमध्ये अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांनी पहिल्यांदाच गावात भीमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरून गावातीलच जातीयवादी गावगुंडांनी त्याची निर्दयीपणे हत्या केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी समाजामध्ये तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली असताना छत्रपती शिवबा -शाहू- फुले -डॉ आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेमुळे अत्यंत व्यथीत झालेल्या प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी सर्वप्रथम 5 जून रोजी अक्षय भालेराव च्या घरी बोंढार या गावी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन करून हत्या पिढीत कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 जून रोजी, दुपारी 3 वाजता.प्रा .जोगेंद्र कवाडे यांनी मुंबई येथे मंत्रालयातील त्यांच्या दालनात मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी निवेदन सादर केले .आणि राज्यात दिवसेंदिवस मागासवर्गीय बौद्धांवरील वाढत असलेल्या अत्याचारासंदर्भात चिंता व्यक्त करत अशा प्रकारच्या घडत असलेल्या अत्याचारामुळे त्यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याकरता आणि वाढते अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी माजी खासदार प्रा.
जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सोबत चर्चा करताना केली आहे.
त्याचबरोबर अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणाचा तपास हा एस. आय .टी.तपास यंत्रणेदारा केल्या जावा. सदर खटला फास्टट्रॅक कोर्टांतर्गत चालवून हत्यारांना मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसह हत्या पीडित अक्षय भालेराव कुटुंबाला 25 लाख रुपयाची सानुग्रह मदत देऊन त्याच्या परिवारातील एकाला तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घेतल्या जावे अशी मागणीही यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाची गांभीर्याने दखल घेत मागासवर्गीयांवरील होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध घालण्याचे दृष्टीने कठोर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतल्या जाईल.जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे अत्याचार घडणार नाही असे सांगून अक्षय भालेराव या हत्यापीडित कुटुंबाला योग्य न्याय दिल्या जाईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी चर्चे दरम्यान शिष्टमंडळाशी बोलताना दिले.निवेदन देताना प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव नगरसेवक प्रमोदराव टाले मुंबई प्रदेश संघटक आनंद कडाळे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती पक्षाच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
Posted inमहाराष्ट्र मुंबई
अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणीप्रा. जोगेंद्र कवाडे यांनी घेतली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट
