महाराष्ट्रातील नोंदीत बांधकाम कामगारांनी घरासाठी दोन लाख रुपये मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावेत.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांच्या घरकुलासाठी दोन लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे.त्यासाठी ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याकडे आठ अ चा उतारा असेल त्यांनाच दोन लाख रुपये मिळणार आहेत. शहरी भागामध्ये घरकुलासाठी अनुदान मिळण्याबाबत शासकिय योजनेमध्ये जर घर असेल तरच साडेचार लाख रुपये मिळू शकतात.
या संदर्भात सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 800 अर्ज दाखल झालेले आहेत. यातील चाळीस अर्ज सध्या मंजूर आहेत. तसेच भीमपलास मिरज येथील प्रकल्पामध्ये साठ अर्ज मंजूर आहेत.उर्वरित अर्जाची छाननी सुरू आहे.त्याबाबत अर्जातील त्रुट्या दूर करण्यासाठी निवारा बांधकाम कामगार संघटनेशी त्वरित संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान सांगली जिल्ह्यातील 14000 अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण पुणे विभागातील सर्व कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी काम करीत आहेत. कालपासून किमान 1000 अर्ज तपासून पूर्ण झालेली आहेत. उर्वरित प्रक्रिया लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.हे काम सुरू झाल्यामुळे निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने 15 जून पासून पुकारण्यात आलेल आंदोलन स्थगित करण्यात येत आहे.
ग्रामीण भागामध्ये व शहरांमध्ये सुद्धा ज्यांच्या मालकीचे घर नाही किंवा पती-पत्नी कुटुंबाचे स्वतःचे घर नसेल तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाची पाचशे स्क्वेअर फुट जागा मोफत देण्याची योजना आहे. यानुसार मागील वर्षी सांगली जिल्ह्यामध्ये 67 कष्टकऱ्यांना 500 स्क्वेअर फुट शासनाने मोफत जागा दिलेली आहे.म्हणूनच याबाबतीमध्ये नोंदणी बांधकाम कामगारांना सुद्धा ज्यांची घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन नाही त्यांना जाहीर केलेल्या शासकीय धोरणानुसार पाचशे स्क्वेअर फुट जागा द्या अशी मागणी करण्यात येणार असून याबाबतचे निवेदन शुक्रवार दिनांक 16 जून रोजी ठीक सकाळी 11 वाजता सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.
तसेच गायरान व शासकीय पड जमिनीवर ज्यांची घरे आहेत त्यांची घरे नियमकुल करा. याबाबतचे अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल कायदा कलम 51 नुसार करण्यात येणार आहेत.
तरी याबाबत अत्यंत महत्त्वाच्या वरील सूचना लक्षात घेऊन जास्तीत जास्त कामगारांनी आपल्या अर्जांची पूर्तता करावी असे आवाहन करणारे पत्र निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी, जनरल सेक्रेटरी प्रा.शरयू बडवे व सचिव कॉ विशाल बडवे यांनी प्रसिद्धस दिलेले आहे
Posted inसांगली
महाराष्ट्रातील नोंदीत बांधकाम कामगारांनी घरासाठी दोन लाख रुपये मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावेत ; निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांचे आवाहन
