बांधकाम कामगारांच्या मध्यान भोजन योजनेमधील अडीच हजार कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी आणि बांधकाम कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या साठी 20 जुलै रोजी मुंबई येथे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा विधानसभेवर धडक मोर्चा!
सांगली निवारा भवन येथे दुपारी तीन वाजता कामगार संघटनांची व्यापक बैठक घेण्यात आली. मुंबई मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातून 500 बांधकाम कामगार व कार्यकर्ते 20 जुलै रोजी मुंबईस नेण्याचा निर्णय घेण्यात आलाभव्य मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यास मार्गदर्शन करताना ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, मागील दोन वर्षापासून नोंदीत बांधकाम कामगारांना मतदान भोजन योजना लागू करण्यात आलेली आहे यानुसार मागील दोन वर्षांमध्ये या योजनेवर अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत परंतु कामगारांच्या पर्यंत जेवण पोहोचत नाही जे जेवण पोहोचते ते निकृष्ट दर्जाचे असून त्यांनी पृष्ठ जेवण दहा कामगारांनी जेवल्यानंतर पाचशे कामगारांची रक्कम संबंधित कंत्राटदारांना दिली जाते. अशाप्रकारे फक्त सांगली जिल्ह्यामध्ये 200 कोटी पेक्षा जास्त रक्कम शासनाने कंत्राटदारांना दिलेली आहे त्यामुळे या मध्यम भोजन योजनेमधील घोटाळा व गैरव्याहराची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. अशी या मोर्चातील एक प्रमुख मागणी आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांची संख्या 25 लाखापेक्षा जास्त आहे. तर दुसऱ्या बाजूस बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी गोळा केलेला उपकर वीस हजार कोटी पेक्षाही जास्त शिल्लक आहे.
परंतु प्रत्यक्षात मात्र बांधकाम कामगारांच्या महत्त्वाच्या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाकडून केली जात नाही. त्याचे मुख्य कारण असे आहे की सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधीच नेमलेले नाहीत. वास्तविक कायद्यामध्ये असे नमूद आहे की या कल्याणकारी मंडळावर कामगारांचे किमान तीन प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. मंडळावर कामगारांचे प्रतिनिधी नेमण्याचा कायदा असून सुद्धा मागील दोन वर्षापासून मंडळावर प्रतिनिधी नेमलेले नाहीत.त्यामुळे कामगारांच्या बाजूने निर्णय घेतले जात नाहीत. शासन एकतर्फी निर्णय घेऊन बांधकाम कामगारांच्या वर अन्याय करीत आहे .
दोन वर्षांपूर्वी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये असा ठराव करण्यात आलेला आहे की, नोंदीत बांधकाम कामगार कामगार कोणत्याही वयाचा जरी असला जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपये देण्यात यावेत. परंतु प्रत्यक्षात मात्र हे मंडळ ज्या कामगारांचे वय 50 पेक्षा जास्त आहे अशा कामगारांचा मृत्यू झाल्यासच दोन लाख रुपये दिले जातात.परंतू 50 पेक्षा कमी वय असलेल्या नोंदीत बांधकाम कामगार मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाख रुपये दिले जात नाहीत.
इतकेच नव्हे तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेनुसार मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना दहा हजार रुपये अंत्यविधीची तरतूद आहे .ती रक्कम सुद्धा महाराष्ट्रामध्ये शंभर पेक्षा जास्त विधवा महिलांना दोन वर्षे होऊन गेली तरी अद्याप मिळालेली नाही.
50 पेक्षा वय कमी असलेल्या कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये द्यावेत असा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये ठराव होऊन सुद्धा या महत्त्वाच्या ठरावास दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनानेच मंजुरी दिली नाही.
विशेष म्हणजे या मंडळाचे अध्यक्ष मागील अनेक वर्षापासून कामगार मंत्रीच आहेत तरीहीं मंडळाच्या अनेक निर्णयांची अंमलबजावणी करण्यास कामगार मंत्री तयार नाहीत.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे, मुलींच्या लग्नासाठी सहाय्य करणे व घर बांधणीसाठी अनुदान देणे इत्यादी महत्त्वाच्या योजनेचे अर्ज मंजूर केले जात नाहीत. आज विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्याचे लाखो अर्ज प्रलंबित आहेत,
घर बांधण्यासाठी च्या अनुदानाचे हजारो अर्ज सध्या या मंडळाकडून गेल्या दोन वर्षापासून पेंडिंग आहेत. ते अर्ज निकाली काढले जात नाहीत.
दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने असाही आदेश केलेला आहे की पूर्वीचे कामगार मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांस पाच हजार रुपये बोनस देण्याचे घोषित केले होते. परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने अद्याप केलेली नाही.
अशाप्रकारे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्यावर अन्याय केला जात आहे. या अन्यायविरुद्ध दाद मागण्यासाठीच वरील मागण्यांच्यासाठी 20 जुलै रोजी मुंबई आझाद मैदान येते प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी या मोर्चासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बांधकाम कामगार संघटनांनी व बांधकाम कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्रातील प्रमुख कामगार संघटनांच्या पुढील प्रतिनिधी कॉ उदय चौधरी,कॉ सुनील पाटील, कॉ रमेश जाधव , कॉ उस्मान शेख, साथी विनिता बालेकुंद्री, आयु.सागर तायडे, कॉम्रेड अशोक कुट्टी, साथी काशिनाथ नकाते, साथी दीपक थोरात, साथी शैलजा अर्नाळकर, कॉ विशाल बडवे, कॉ संतोष बेलदर, कॉ सलीम इनामदार व प्रा. शरयू बडवे इत्यादींनी केलेले आहे.
असे पत्रक ज्येष्ठ कामगार नेते व महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्धस दिलेले आहे.