पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे मुंबई आझाद मैदान येथे भूमिहीनांचा सत्याग्रह आंदोलन

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे मुंबई आझाद मैदान येथे भूमिहीनांचा सत्याग्रह आंदोलन

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे मुंबई आझाद मैदान येथे भूमिहीनांचा सत्याग्रह आंदोलन
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
म महाराष्ट्र राज्यातील अनूसुचीत जाती समुहातील भूमिहीन शेतमजूर शेतमालक बनला पाहिजे या आग्रही मागणी करीता पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचे सत्याग्रह आंदोलन आझाद मैदान येथे करण्यात आले
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील दारिद्र्यरेषेची अट रद्द करावी .या योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायती करिता आठ लाख रुपये व जिरायती करिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून भूमीहिंन शेतमजुरांना बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी राज्यातील महसूल पडीक जमीन इनाम जमीन सैनिकी जमीन 32 ग प्रकार जमीन राज्य शासनाने खरेदी करून लँड बँक तयार करावी व पात्र भूमीहिनांना देण्यात यावी. पूर्वीच्या काळी राजे राजवाडे यांनी दलित, अनुसूचित जाती समाजाच्या गटसमूहाला शेत जमिनी दिल्या होत्या उदाहरणात माहरकी, महार वतन ,हडकी परंतु त्यांचे सध्या वंश वाढल्याने व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या जमिनीचे रूपांतर एक ते पाच गुंठेच्या मालकीचे झाले आहे या जमिनीवर त्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होत नाही. तसेच त्या जमिनीत कसता येत नाहीत त्यामुळे एक ते पाच गुंठ्याच्या जमीन मालकांना इतरांच्या शेतावर शेतमजूर करून आपले दरिद्री जीवन जगावे लागत आहे .अशा एक ते पाच गुंठ्याच्या भूधारकांना भूमीहीन म्हणून घोषित करावे व योजनेचा लाभ घ्यावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी आई-वडील पती-पत्नी यांच्या नावे 25 वर्षांपूर्वी शेतजमीन नसल्याच्या दाखल्याची अट रद्द करावी भूमिहीन शेतमजूर दाखला तहसीलदाराने कोणत्या निकषाने द्यावा याचा आदेश अध्यापित तलाठी व तहसीलदार यांना शासनाने दिलेले नाहीत तर भूमिहीन ठरवण्याचा निकष शासनाने त्वरित जाहीर करावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी शासनाने लाभार्थ्यांना भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला त्याच गावातील शेतकऱ्याकडून घेण्याची अट रद्द करावी या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रधान क्रमाचे अट रद्द करून जिल्ह्यात कुठेही जमीन खरेदी करून देण्याची मुभा देण्यात यावी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील पूर्वी लाभ घेतलेल्या भूमीहीन शेतमजुरांना त्यांच्या जमिनीचे कर्ज माफ करावे प्रतिवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेसाठी शासनाने प्रतिवर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद करावी वरील
मागण्यांकरीता भर पावसा मध्ये दिवसभर आंदोलन करण्यात आले सायंकाळी पाच वाजता सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव यांच्यासी आंदोलक शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन देण्यात आले या आंदोलनात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे, प्रदेश महीला आघाडी संघटक ज्योतीताई झरेकर,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंगराव कांबळे, इचलकरंजी महानगर जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दातार,कामगार आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दगडू कांबळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनोद बनसोडे,पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे, पुणे शहर संघटक विजय बनसोडे, मुंबई येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब यादव , विशाल कांबळे सर आदींच्या सह पँथर आर्मीचे बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाची दखल राज्य शासनाने गांभीर्याने न घेतल्यास महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशारा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांनी दिला

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *