इंजिनिअरिंगची चार वर्ष जीवनाला दिशा देणारी -:मगदूम अभियांत्रिकीच्या कार्यक्रमात कमांडर प्रताप पवार यांचे मत
जयसिंगपूर येथील डॉ. जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कमांडर प्रताप पवार उपस्थित होते. भविष्यात येणाऱ्या तीस वर्षांमध्ये इंजिनीअर्सना वेगळे महत्त्व प्राप्त होईल असे मत कमांडर पवार यांनी बोलून दाखवले. जागतिक पातळीवरती संशोधनात झालेली वाढ आणि पेटंट्सना मिळालेले वेगळे महत्त्व पाहता भावी पिढीतील इंजिनियर्सना चांगलाच वाव मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड सोडून शहरी भागातील विद्यार्थ्याशी आपण स्पर्धा करू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या शिक्षणासाठी आई-वडील उचलत असलेले कष्ट, त्यांची ध्येये, कॉलेजचे नाव उज्वल करण्यासाठी आपण अविरत प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले. संस्थेचे चेअरमन डॉ.विजय मगदूम व व्हाईस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी संदेशाद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पाहुण्यांचे स्वागत डॉ. एस. एस. साजणे यांनी केले. प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. एस.बी. पाटील यांनी महाविद्यालयीन शैक्षणिक व तत्सम कार्यप्रणाली वरती प्रकाश झोत टाकून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि पालकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू असे प्राचार्यानी प्रस्ताविकात सांगितले.
बलूनच्या रंगावरती त्याची कार्यक्षमता अवलंबून नसून बलून मध्ये भरली गेलेली हवा किंवा वायू कोणत्या प्रकारचा आहे यावरती त्याची आकाशात जाणारी उंची ठरणार आहे असे मत उदाहरणासह कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. महाविद्यालयाचे असणारे ब्रीदवाक्य आणि अनुभवी प्राध्यापक व सोई सुविधा यांच्या जोरावर आम्ही विद्यार्थ्यांना १०० टक्के घडवन्याचा प्रयत्न करु असे त्यांनी पालकांना आश्वस्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. बी.मोरे यांनी केले, आभार डॉ. एस. एम
आत्तार यांनी मांनले कार्यक्रमास सर्व डिन्स, विभाग प्रमुख, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. एम. बी.भिलवडे प्रा. पी.ए. चौगुले व विनायक चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
Posted inकोल्हापूर
इंजिनिअरिंगची चार वर्ष जीवनाला दिशा देणारी -:मगदूम अभियांत्रिकीच्या कार्यक्रमात कमांडर प्रताप पवार यांचे मत
