इचलकरंजी : पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना प्रथम वर्धापन दिन व महामाता रमाई भिमराव आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्यावतीने महामाता रमाई पुरस्कार व समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळा व निराश्रीत भूमीहिन शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी भूमी हक्क परिषद चे आयोजन इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी हॉल येथे सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस. आठवले हे आहेत तर भुमी हक्क परिषदेचे अध्यक्षस्थान जिल्हा अध्यक्ष जयसिंराव कांबळे भुषवणार आहेत .
यावेळी माणगांवचे विद्यमान सरपंच राजू मगदूम , उमेश जामसंडेकर ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्रीय सल्लागार , चंद्रकांत मुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ,
श्री प्रमोद दिवेकर प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी ,
सौ मीराताई वर प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी , ज्योतीताई झरेकर प्रदेश संघटक प्रा . अरुण जी मेडे प्रदेश संघटक , सुंदर ( नाना ) मिसळे प्रदेश उपाध्यक्ष , तौफिक भाई किल्लेदार प्रदेश उपाध्यक्ष ,
फैयाज इनामदार महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
Posted inकोल्हापूर
महामाता रमाई आंबेडकर जंयती व पँथर आर्मी वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी येथे समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
