शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सूचना व हरकती सादर कराव्यात

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सूचना व हरकती सादर कराव्यात

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सूचना व हरकती सादर कराव्यात

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता देण्यात आला असून त्याबाबत 8 फेब्रुवारी पर्यंत सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्या-या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये (इंग्रजीकरीता Awards) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह देण्यात आला आहे. हा प्राथमिक छाननी अहवाल असून अंतिम नाही. 8 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत विहित नमुन्यात सूचना व हरकती सादर करावयाच्या आहेत. विहीत नमुना https://sports maharashtra.gov.in या संकेतस्थावरुन डाऊनलोड करुन घ्यावा, असे क्रीडा विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात येत आहे.

0000000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *