संजय शिंदे यांची शिरोळ तालुका संजय गांधी निराधार अनुदान समिती सदस्य पदी निवड

संजय शिंदे यांची शिरोळ तालुका संजय गांधी निराधार अनुदान समिती सदस्य पदी निवड


शिरोळ : रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे शिरोळ तालुका सचिव व सैनिक टाकळी गावचे सुपुत्र संजय वसंत शिंदे यांची शिरोळ तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्य पदी निवड करण्यात आल्याचे लेखी आदेश कोल्हापुर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे .
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केन्द्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे संजय शिंदे कट्टर समर्थक आहेत . गेली तीन दशके त्यांनी आंबेडकरी रिपब्लीकन चळवळीत स्वतः ला वाहून घेऊन सामाजिक कार्य करीत आहेत . यांची दखल घेऊन शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संजय गांधी कमिठी सदस्य पदाची संधी दिली आहे . निवडीबद्दल संजय शिंदे यांचे तालुक्यातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *