!सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्थेचे कार्य प्रेरणादायी!!
संपतराव गायकवाड यांचे प्रतिपादन
गुडाळ वार्ताहर /संभाजी कांबळे
सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था गगनबावडा या संस्थेचे कार्य प्रेरणा देणारे व दीपस्तंभा सारखे असून या संस्थेमार्फत गेले दोन ते तीन वर्षे आजवर 70 ते100 अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप या संस्थेमार्फत दातुत्व , मातृत्व पितृत्व व समाजामध्ये सामाजिक कार्याचा ठसा उमटणारी एकमेव संस्था म्हणजे सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था होय असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपतराव गायकवाड माजी शिक्षक संचालक यांनी कोल्हापुर येथे शाहू स्मारक नाट्यगृहामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुरस्कार वितरण व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम मनोगत मध्ये व्यक्त केले.
या संस्थेने प्रत्येक वर्षी पर्यावरण संतुलन ,झाडे लावा झाडे जगवा रक्तदान शिबिर ,आरोग्य शिबिर हुंडाबळी ,साक्षरता अभियान, लेक वाचवा अभियान स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नवीनच ओळख निर्माण केली आहे.
यावेळी आज 27 अनाथ 3 गरजू विद्यार्थी असे 30 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण समाज रत्न पुरस्कार 2 व बालरत्न पुरस्कार दोन असे संयुक्त कार्यक्रम शाहू स्मारक हॉल कोल्हापूर येथे कार्यक्रम संपन्न झाला .
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रफिक काझी यांनी आज अखेर 1200विद्यार्थ्यांना मदत करून शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्याचे पवित्र कार्य केल्याचे नमूद करून भविष्यात वस्तीग्रह, स्पर्धा परीक्षा ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर के एन पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजप कोल्हापूर जिल्हा यांनी सर्वोदय संस्था योगी दिशेने काम करीत असून त्यांना आमचे पूर्ण सहकार राहील असे नमूद केले प्राध्यापक सावंत सर यांनी मनोगत मध्ये व्यक्त करून दरवर्षी तीन अनाथ विद्यार्थ्यांना मोफत सावंत कोचिंग क्लासेस तर्फे शिकवले जाईल अशी ही आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले
यावेळी अनंत कवळेकर नायब तहसीलदार तालुका वैभववाडी डॉ एमजी जमादार, नंदकुमार पाटील रिंकू देसाई, बुद्धीराज पाटील भगवान सुतार, सरदार सरनोबत हनीफ नाकाडे, डॉक्टर फारुख काझी, पराग फडणीस आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री रफिक काझी यांनी केले तर आभार एम एस चव्हाण सहाय्यक शिक्षक विद्यामंदिर आरे यांनी मांडले.