केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सोमवारी जयसिंगपूर दौऱ्यावर.
कुरुंदवाड / संघर्षनायक मीडिया वृत्तसेवा
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे जयसिंगपूर येथील आरपीआयचे जिल्हा संघटक राजू शिंदे यांच्या घरी सांत्वनासाठी भेट देणार आहेत अशी माहिती आरपीआय तालुका सचिव संजय शिंदे यांनी दिली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका खाजगी कार्यक्रमासाठी जयसिंगपूर येथे येणार आहेत. आर पी आय चे जिल्हा संघटक राजू शिंदे यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे सांत्वन करण्यासाठी दुपारी दोन वाजता राजू शिंदे यांच्या घरी उपस्थित राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येत असल्याने कोणतीही राजकीय चर्चा होणार नसल्याचेही आरपीआय तालुका सचिव संजय शिंदे यांनी सांगितले आहे.
Posted inकोल्हापूर
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सोमवारी जयसिंगपूर दौऱ्यावर.

The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.