*जे.जे. मगदूम अभियांत्रिकीच्या २७ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड : वार्षिक ४. ५० लाख हून अधिक पॅकेज *
जयसिंगपूर येथील डॉ. जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील विविध विभागातील २७ विद्यार्थ्यांची निवड सेव्हन्थ सेन्स टॅलेंट सोल्युशन्स बेंगलुरु या कंपनीमध्ये वार्षिक साडेचार लाख रु. पॅकेजवरती निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.
योग्य मार्गदर्शन, अचूक अभ्यासाची दिशा, व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा.पी.पी. माळगे यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी नमूद केले.चेअरमन, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांच्या सततच्या मार्गदर्शनासाठी त्यांनाहि धन्यवाद दिले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंगच्या बालाजी जारे, तन्मय पाटील, भक्ती कुलकर्णी, अनुश्री मुथालिक, अभिषेक नांदगावकर, दीप कमलाकर, आकाश पाटील, श्रेया ठोंबरे, आरती खाडे, रिनल शहा,सुयोग बावडेकर, आदिती पाटील अशा १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागाच्या प्रज्ञा चव्हाण , रोहित सस्ते, रचना सरगर व एम.सी.ए.विभागाच्या मिसबा शेख तर आय.टी. विभागाच्या निलेश श्रेयस, राजकुमार ऐनापुरे,यशोदा कोळपे, प्रतीक्षा माने, रुचिता यादव,सोनल मेथे, ऋषिकेश मगदूम, वैभव तोडकर,वैभवी गायकवाड, अवंतिका जांभळे, सायली पाटील यांची निवड झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील मंदीच्या काळात निवड झालेल्या विद्यार्थ्याना नोकरीची संधी मिळाली, खरोखरच ही उल्लेखनीय बाब असून विभाग प्रमुख, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे कॉर्डिनेटर या सर्वांचे अभिनंदन होत आहे.
Posted inकोल्हापूर
जे.जे. मगदूम अभियांत्रिकीच्या २७ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड : वार्षिक ४. ५० लाख हून अधिक पॅकेज
