इचलकरंजी –
धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव आणि माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्या 14 मे रोजी होणार्या वाढदिवसाचे औचित्य साधत मनोज साळुंखे फाऊंडेशनच्या वतीने लिंबू चौकातील समाधान वृध्दाश्रमातील वृध्दांना रविवारी भोजन देण्यात आले.
दरवर्षी 14 मे रोजी मनोज साळुंखे यांचा वाढदिवस आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा धर्मवीर संभाजी महाराज जयंती आणि मनोज साळुंखे यांचा वाढदिवस एकाच दिवशी आले आहेत. हा दुग्धर्शकरा योग साधत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
मनोज साळुंखे फाउंडेशनच्या वतीने समाधान वृध्दाश्रम येथील निराधार वृध्दांना भोजन वाटप करण्यात आले. संगांयो समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या, अरविंद वाघिरे, शिवाजी जगताप, दत्ता शिंगारे, बसवराज कोटगी, लक्ष्मण कबनुरे, सिताराम ओझा, दिलीप धातुंडे, विजय बनसोडे, पापा उस्ताद, सतीश भस्मे, संभाजी शिंगारे, प्रकाश नाईक, अविनाश सावरतकर यांचे हस्ते भोजन वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी चांद जमादार, सतीश पाटील, रवींद्र भांडे, धनंजय दाहोत्रे, निलेश पाटील, आकाश वासुदेव, सलीम नदाफ, संदीप गवड, अमन शिरगावे आदींसह फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भागातील नागरिक उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
समाधान वृद्धाश्रमात भोजनदान
