हातकणंगलेत पत्रकार मारहानीचा महाराष्ट्र पत्रकार संघाकडून निषेध
तहसिलदारांना निवेदन सादर
वर्तामान पत्रामध्ये खरी व वस्तुनिष्ट बातमी छापल्याचा कारणातून मुरगुड ता . कागल येथील पत्रकार प्रकाश तिराळे ( रा . कुरूकली ) यांना येथील माजी नगराध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मारहन केल्याची घटना घडली आहे , या घटनेच्या निषेधार्थ आज हातकणंगले येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतिने संबंधीत घटनेचा निषेध करून संबंधीतांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन तहसिल हातकणंगले यांना देण्यात आले .
पत्रकार प्रकाश तिरळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला न्हवता घडलेल्या घटनेचे वृतांकण करण्याचे काम पत्रकार तिरळे यांचे कडून करण्यात आले होते , समाजात अनेक घटना घडत असतात त्या त्यांची माहिती संकलीत करून ती बातमी च्या रूपाने प्रसारीत करण्याचे काम होत असते मात्र राजेखान जमादार यांची कृती ही लोकशाहीला घातक अशी असल्याची समाजभावना झाली असुन तिरळे यांना मारहन करणाऱ्या राजेखान जमादार व त्याचे दोन सहकारी आसिफखान जमादार व संदीप सणगर यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी तसेच राजेखान जमादार हे ज्या पक्षाचे काम करतात त्या पक्ष नेतृत्वानेही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच तिरळे कुटूंबियांना पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदणाद्वारे करण्यात आली आहे .
यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या सदरचे निवेदन हातकणंगले तहसिलदार यांच्या वतिने निवडणूक नायब तहसिलदार संजय पुजारी यांनी स्वीकारले यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्तीत होते .