
अब्दुल लाट गावातील शाहू मैदानावर लोकराजा राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या 150 वी जयंतीच्या निमित्ताने पिंपळ वृक्षाची वृक्षारोपण करून जयंती साजरी करण्यात आली. करवीर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी आयुष्यभर लोककल्याणकारी निर्णय घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळी दसरा उत्सवासारखी साजरी झाली पाहिजे. कारण छ. शाहू महाराजांनी केलेले कामच तसं आहे. त्याचा फायदा आजच्या पिढीला देखील होत आहे. धरण, पर्यावरण, शिक्षण, मैदानी खेळ कुस्ती, उद्योग, वस्तीगृह, आरक्षण असे भरघोस काम शाहू महाराजांनी केले आणि लोककल्याणकारी राजा जनतेचा राजा अशी अजरामर ओळख त्यांनी निर्माण केली. आणि म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शाहू महाराज जयंती ही दसरा दिवाळी प्रमाणे साजरी केली पाहिजे. त्यांचाच आदर्श घेऊन अब्दुललाटेतील एस् एस् कुरणे ग्रुपचे सतीश कुरणे यांनी छत्रपती शाहूंच्या विचारांचा वारसा घेऊन एक खारीचा वाटा म्हणून शाहू मैदानात पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण केले.आणि दीर्घकाळ सावली,दीर्घकाळ आॅक्सीजन, पशु पक्षी निवारा व पर्यावरण समतोल व्हावी ही भावना जपत त्या पिंपळ वृक्षाला छ.शाहू नैसर्गिक ऑक्सिजन नाव दिले. व ते वृक्ष जगवण्याची हमी दिली. त्यावेळेस गावातील आंबेडकरी चळवतील जेष्ठ नेते काकासो कुरणे,सुनिल ठिकणे,अबोली कुरणे, ज्ञानेश्वर कांबळे इ.हजर होते.