ॲड. प्रकाश आंबेडकर : दोषींवर कारवाई करा अन्यथा आंदोलन उभे करू
अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील रहिवासी वाल्मिकी समाजातील संतोष पावल या युवकावर अकोला तालुक्यातील दहिहंडा पोलिस स्टेशन पोलिस अधिकाऱी व कर्मचारी यांनी बेदम मारहाण केली होती. तसेच सतत पैशाची मागणी या पोलिसांनी केली होती या अन्यायला आणि पोलीस जाचाला कंटाळून संतोष पावल या युवकाने विषरी औषधी प्राशन करून आपली जिवनयात्रा संपवली होती.
तसा जवाब हा नागपूर येथील वैद्यकीय दवाखान्यात तेथील पोलीस निरीक्षकांनी नमूद केले होते. तशी माहितीही अकोला पोलिसांना दिली गेली परंतू 2 महिन्यात सदर आरोपी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात न झाल्याने संतोष पावल या युवकाची आई, पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी रविवारी (दि.18) यशवंत भवन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली.
मृतक संतोष पावल याच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून असलेले मृतकाचे मित्र दारोकार यांनी सगळी घटना बाळासाहेब आंबेडकर यांच्या समोर सांगितली