महात्मा गांधी जयंती विविध परिवर्तनवादी संस्थांतर्फे साजरी
फोटो ओळ – महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना ॲड. धनंजय पठाडे सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार, आय.ए. नाईक,अमोल कुरणे, संतोष आठवले, संभाजी चौगुले आदी.
महात्मा गांधी जयंती विविध परिवर्तनवादी संस्थांतर्फे साजरी
कोल्हापूर,दि.२ (प्रतिनिधी) देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एकत्रित आणून महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली. आजही त्यांच्या विचाराची देशाला गरज असल्याचे मनोगत ॲड. धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरातील पापाची तिकटी येथे विविध परिवर्तनवादी संस्थांतर्फे महात्मा गांधी जयंती प्रसंगी ते बोलत होते. पापाची टिकटी येथे १९५१ साली चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांच्या आर्थिक मदतीने व लोकवर्गणीतून या अर्ध पुतळ्याची ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी उभारणी केली होती. सुरुवातीस महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार, एम .आय.डी.सी. चे कार्यकारी अभियंता आय.ए. नाईक, परिवर्तनचे अमोल कुरणे, पॅंथर आर्मीचे संतोष आठवले, संभाजी चौगुले, राज कुरणे, शेखर पोवार, अभय बहिरशेठ, मोहन माजगावकर, जहांगीर अत्तार तसेच बाल विद्यार्थी स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभूषेत उपस्थित होते.