पुणे दि. राज्यातील होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणामध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक निवडणुकांमध्ये बहुजन जनता दलाकडून समर्थन देऊन सहभागी होऊन विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या अध्यक्ष खाली झालेल्या पुणे येथील बहुजन जनता दलाच्या केंद्रीय मध्यवर्ती कार्यालयात राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व शक्ती नव्याने स्थापन करण्यात आलेल्या परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी निवडणुकांच्या मैदानात उतरणार असून या परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी माजी खासदार. छत्रपती संभाजी राजे भोसले. माजी खासदार आणि स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष. राज्याचे माजी मंत्री व आमदार प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू या तीन नेत्यांनी काही दिवसापूर्वीच परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी ची घोषणा केली असून परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी बहुजन जनता दल राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि माजी मंत्री व आमदार बच्चू कडू या तिन्ही नेत्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असून या तिन्ही नेत्यांनी बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना असे सांगण्यात आले की लवकरच परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीची महत्वपूर्ण बैठक पुणे येथे लवकरच घेण्यात येणार असून या बैठकीमध्य माजी खासदार राजू शेट्टी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले माजी राज्यमंत्री व आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक नेते उपस्थितीत राहणार असून या बैठकीमध्ये बहुजन जनता दलाला परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याचे बहुजन जनता दलाकडून परिवर्तन महाशक्ती मध्ये सहभागी होण्यासाठी बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे हे पत्र देणार असल्याची ही माहिती बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिली आहे
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी च्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील बाळापूर. माझे ठाणे जालना साकोली पर्वती भायखळा खडकवासला अकोला पूर्व खामगाव कर्जत या ठिकाणच्या विधानसभेच्या जागेवर उमेदवार उभे करून निवडणूक लढणार असल्याचेही बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले
यावेळी सुभाष सुरवाडे राजेश कोळी गणेश ठाकरे मंगेश कोकणे किशोर तिवारी भगवान पाटील राजेंद्र पाटील उत्तमराव ढिकले नितीन रामशे नरेश गजभिये अश्विन चांदुरकर शेख मुल्लानी गजेंद्र अहिरे हिम्मत गावंडे मंगेश कर्णिक तुकाराम दुधाने यांच्यासह बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच बहुजन जनता दल युवा आघाडी बहुजन जनता दल महिला आघाडी बहुजन जनता दल वैद्यकीय कामगार आघाडी यांच्यासह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे बहुजन जनता दल केंद्रीय मध्यवर्ती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे
Posted inपुणे
परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीमध्ये बहुजन जनता दल सहभागी होऊन आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय -पंडितभाऊ दाभाडे
