अवैध मद्य निर्मिती विक्री व वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्या – एक्साईज आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने एक्साईज विभागाची बैठक

अवैध मद्य निर्मिती विक्री व वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्या – एक्साईज आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने एक्साईज विभागाची बैठक

अवैध मद्य निर्मिती विक्री व वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्या – एक्साईज आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने एक्साईज विभागाची बैठक

कोल्हापूर, दि.२ (प्रतिनिधी) निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्याकरिता दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने आदर्श आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी अवैध दारूची निर्मिती, वाहतूक, विक्री होणार नाही अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिल्या. ते म्हणाले, असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. यासाठी सतर्क राहून नियमांर्तगत तरतूदी नुसार दारूबंदी गुन्ह्यांतर्गत गुन्हे नोंदविण्याकरिता आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून प्रभावीपणे गुन्हा अन्वेषणाचे कामकाज करावे. विधानसभा निवडणूक २०२४ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने दि. १ ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस अंमलबजावणी व दक्षता संचालक प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागाचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे, सातारा अधीक्षक रविंद्र आवळे, रत्नागिरी अधीक्षक किर्ती शेंडगे, सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे, कोल्हापूर उपअधीक्षक युवराज शिंदे, सांगली उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे व पाचही जिल्ह्यातील निरीक्षक व दुय्यम निरीक्षक तसेच कोल्हापूर विभागातील कार्यकारी, अकार्यकारी निरीक्षक उपस्थित होते.
सर्व किरकोळ ठोक मद्य विक्रेत्यांची दुकाने, विक्री केंद्रे उघडणे व बंद करण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जातील, याची दक्षता घेण्यात येणार आहे. सर्व किरकोळ ठोक मद्य विक्रेत्यांच्या अनुज्ञप्तीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यरत आहेत याची दक्षता घेण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. सर्व मद्यनिर्माण घटकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील मद्यनिर्माणी घटकांमधुन मद्य विनापरवानगी वितरीत केले जाणार नाही. विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभाग, बेळगाव जिल्हा यांचे सोबत बैठक आयोजित करून त्या बैठकी वेळी गुन्हा अन्वेषणाची माहिती, सराईत गुन्हेगारांची यादी, कर्नाटक राज्याच्या सीमेपासून ५ कि.मी. अंतरामधील किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्याची यादी, तात्पुरते सीमा तपासणी नाक्याची यादी, सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे नाव व मोबाईल नंबर इत्यादी माहितीचे आदान प्रदान करावी. कर्नाटक, गोवा राज्यात उभारण्यात आलेल्या तात्पुरते तपासणी नाक्याच्या मार्गावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर निगरानी पथकांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर कार्यवाही करावी. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यात यावे. सांगली, कोल्हापूर जिल्हयाच्या लगतच्या महाराष्ट्र कर्नाटक तसेच गोवा-महाराष्ट्र राज्याच्या सिमावर्ती भागातून बेकायदेशीर मद्याची वाहतूक, साठा, विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने विशेष दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. तसेच बैठकीमध्ये विभागातील मद्यविक्री व जमा-महसुलाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *