मौजे घाटकरवाडीत राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांचा संयुक्त छापा३ लाख ७७ हजार ६८० इतका मुद्देमाल जप्त

मौजे घाटकरवाडीत राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांचा संयुक्त छापा३ लाख ७७ हजार ६८० इतका मुद्देमाल जप्त

मौजे घाटकरवाडीत राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांचा संयुक्त छापा
३ लाख ७७ हजार ६८० इतका मुद्देमाल जप्त


कोल्हापूर, दि. ५ – आजरा तालुक्यातील मौजे घाटकरवाडी या गावच्या हद्दीत राजाराम आनंदा तांबेकर यांच्या आज राहत्या घराची व घराजवळील गोठयाच्या तपासणीत राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांचा मौजे घाटकरवाडीत संयुक्त छाप्यात ३ लाख ७७ हजार ६८० इतका मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती चंदगड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
आजरा तालुक्यातील मौजे घाटकरवाडी या गावच्या हद्दीत राजाराम आनंदा तांबेकर याच्या राहत्या घराची व घराजवळील गोठयाची तपासणी केली. येथील आढळून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमो त्याचा वाहन क्रं.MH-४५-N-०३८८ या वाहनामध्ये मिळून गोवा बनावट विदेशी मद्याचे गोल्डन एस ब्ल्यू फाईन व्हिस्कीचे १८० मिलीच्या १९ बॉक्स मिळून आले. सदर ठिकाणी मिळून आलेल्या वाहनासह गोवा बनावट विदेशी मद्याची एकूण किंमत रु. ३ लाख ७७ हजार ६८०/- इतका मुद्देमाल कारवाईस्तव जप्त करण्यात आला आहे. आरोपी इसम राजाराम आनंदा तांबेकर याचेवर गोवा बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीररीत्या विनापरवाना साठा केलेबाबत महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घाटकरवाडी हद्दीत राजाराम आनंदा तांबेकर यांच्याकडे बेकायदेशीररीत्या गोवा बनावट विदेशी मद्याचा विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करुन ठेवले असल्याची बातमी मिळालेनुसार अवैद्य गोवा बनावट विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, विभागाची संयुक्त कारवाई आज करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मुंबई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, व कोल्हापूर विभागीय राज्य उत्पादन शुल्काचे उप आयुक्त विजय पी. चिंचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे, कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क युवराज शिंदे, उपअधीक्षकसो यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज व हातकणंगले निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रं.०१ व ०२ यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे कारवाई करण्यात आली.
या संयुक्त कारवाईमध्ये गडहिंग्लज निरीक्षक प्रमोद खरात, हातकणंगले निरीक्षक महेश गायकवाड, कोल्हापूर भरारी पथक १ चे सदानंद मस्करे, कोल्हापूर भ.प.क्रं.०२ दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, गडहिंग्लज क्रं.०२ दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. प्रदीप गुरव, श्री. नरेश केरकर तसेच जवान संदीप जानकर, भरत सावंत, संदीप चौगुले,देवेंद्र पाटील यांनी मदत केली.
या गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गडहिंग्लज २ चे दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे हे करीत आहेत.
०००००

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *