नोंदीत बांधकाम कामगारांच्या मृत्यू संबंधीचे थकीत सर्व लाभ त्वरीत वारसदारांना देण्याचा बांधकाम कल्याणकारी मंडळाचा निर्णय.
निवारा बांधकाम कामगार संघटनेचे शिष्टमंडळ 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळाच्या वतीने मागणी अशी करण्यात आली की सध्या मागील चार वर्षांमध्ये मंडळाकडे नोंदणी असलेल्या ज्या शेकाडो कामगारांचा मृत्यू झालेला आहे. ज्या अनेक कामगारांचे अपघाती झालेले आहेत. त्यांच्या वारसांना कसलेच लाभ योजनेत असूनही अद्याप मिळालेली नाहीत.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई, पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असल्यास आणि बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई, सर्वच कामगारांच्या विधवा महिलांना पाच वर्षे महिन्याला दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य आणि गंभीर आजारासाठी एक लाख रुपये आर्थिक सहाय्य आहे . तसेच अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये देण्याची तरतूद योजना आहे.
शिष्टमंडळामधून आलेल्या श्रीमती शुभांगी गावडे ,श्रीमती मनीषा येळावकर व श्रीमती सुनिता वडेर यांना मागील चार वर्षापासून वर्षाला मिळाव्याचे जे 24 हजार रुपये आहेत ते अद्याप मिळालेले नाहीत. अनेक वेळा मागणी करून सुद्धा आर्थिक सहाय्य मिळालेले नाही असे त्यांनी प्रत्यक्ष श्री विवेक कुंभार यांना सांगितल्. कारण याबाबत ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प आहे.
अशाप्रकारे राज्यातील
शेकडो विधवा महिलांच्या वर सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या संदर्भातली संपूर्ण माहिती कमेंट शंकर पुजारी यांनी सचिवांना सांगितली.
शिष्टमंडळामध्ये प्रत्यक्षात चार विधवा महिलाही सांगली जिल्ह्यातून आलेल्या होत्या. त्यांनी नुकसान भरपाई न मिळाल्याबद्दल च्या समस्या श्री विवेक कुंभार यांना सांगितल्या.
बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांनी चर्चेमध्ये सांगितले की ऑनलाईन पद्धतीचा वापर करून मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या वारसांना व विधवा महिलांना योजनेचे लाभ मिळण्याबाबत विलंब होत आहे हे मान्य असून याबाबत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नुकताच असा ठराव करण्यात आलेला आहे की नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या वारसांना किंवा प्रत्यक्ष नोंदीत बांधकाम कामगारांना वरील योजनांचे लाभ द्यायचे असल्यास ते ऑफलाइन पद्धतीने डायरेक्ट देण्यात येणार आहेत .
त्याबद्दलचा शासन निर्णय लवकरच होणार असून मागील संपूर्ण थकबाकीसह विधवा महिलांना त्याचे लाभ देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.
चर्चेमध्ये कॉ विशाल बडवे यांनी असेही सांगितले की सध्या अनेक जिल्ह्यांच्या मध्ये बांधकाम कामगारांच्या लाभ कारक योजना विषयक अर्ज स्वीकारण्याची ऑनलाईन पद्धत पूर्णपणे बंद आहे की त्वरित सुरू करावी अशी मागणी केली. याबाबत श्री विवेक कुंभार यांनी सांगितले की योजनांचे लाभ मिळण्याची जी ऑनलाईन प्रक्रिया सध्या ज्या ठिकाणी बंद असेल ती त्वरित सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळामध्ये कॉ शंकर पुजारी, कॉ विशाल बडवे, श्री राजेंद्र मंगसुळे, श्री रणजीत लोंढे, शुभांगी गावडे, मनीषा येलांवकर, सुनिता वडेर, दिपाली सोमदे, गणेश ओव्हाळ आणि राजेंद्र मंगसुळे इत्यादींचा समावेश होता.
.
Posted inसांगली
नोंदीत बांधकाम कामगारांच्या मृत्यू संबंधीचे थकीत सर्व लाभ त्वरीत वारसदारांना देण्याचा बांधकाम कल्याणकारी मंडळाचा निर्णय.
