कॉ. सुमन पुजारी, उमेश गाड यांना समता जीवन गौरव पुरस्कार जाहीर
रविवार दि. 10 नोव्हेंबरला कोल्हापुरात कोणार पुरस्कार वितरण
कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्मिती विचारमंच आणि संविधान जनजागृती अभियानाचा या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा समता जीवन गौरव पुरस्कार कष्टकरी जनतेच्या वेदना समजून घेऊन त्यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या सांगलीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व कामगार नेत्या कॉ. सुमन पुजारी आणि गोव्यातील मराठी बहुजन समाजातील माणसांना एकत्र करून प्रबोधन क्षेत्रात दखलपात्र काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, डाव्या पुरोगामी चळवळीचे सक्रिय नेते उमेश गाड यांना जाहीर झाला असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक अनुप जत्राटकर, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्या हस्ते रविवार दि. 10 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 11:30 वा.
राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये संविधान जनजागृती अभियानाच्या प्रमुख अॅड. करुणा विमल यांनी दिली.
मानाचा कोल्हापुरी फेटा, मानपत्र, सन्मानाचिन्ह आणि परिवर्तनवादी चळवळीची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप असून सर्वसामान्य वंचित, बहुजन समूहासाठी रस्त्यावर काम करणाऱ्या कृतिशील कार्यकर्त्याचा यानिमित्ताने समता पुरस्कार देऊन सन्मान होत आहे.
पत्रकार परिषदेला अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, अश्वजीत तरटे, शर्वरी पाटोळे, नमिता धनवडे आदी उपस्थित होते.
व
आ