नवे दानवडमध्ये आमदार यड्रावकर यांचा झंजावत दौरा
नवे दानवाड येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जाहीर प्रचार सभा संपन्न झाली.यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली काढण्यात आली.
येथील मारुती मंदिर या ठिकाणी प्रचार रॅलीचे सभेत रुपांतर झाले.
प्रारंभी स्वागत सरपंच सी.डी.पाटील यांनी केले.
यावेळी संतोष आठवले,भरमगोंडा पाटील,राजू कांबळे,प्रकाश तिपण्णावर यांनी आपल्या मनोगतातून नवे दानवाड गावासाठी १० कोटी २ लाख रुपयांची विकास कामे झालेली असून आदी प्रस्तावित कामे लवकरच होवून गांवचा कायापालट होत असल्याचे सांगून शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून आमदार यड्रावकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला.तसेच येथील दड्डी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने संपूर्ण शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार यड्रावकर यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी आमदार यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील विकास कामांचा आढावा म्हणला व यापुढेही जनतेच्या सेवेसाठी नेहमी काम करेन अशी ग्वाही देत, शिट्टी या या चिन्हासमोरील बटन दाबून उच्चांकी मताने निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रकाश पाटील टाकवडेकर,उपसरपंच प्रशांत कांबळे,रावसो कुंभोजे, आण्णाप्पा कांबळे,मनोहर मोकाशी, रोहिदास निर्मळे,शिवानंद माळी, सातगोंडा पाटील,युनुस कुरणे,सचिन सांगलीकर,दिपक कांबळे,संतोष आठवले,पांडूरंग धनगर,बिरु धनगर, विजय बेरड,राजू बेरड,वैशाली चौगुले, चंद्रकांत कांबळे,सारिका परीट यांच्यासह गावातील पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.आभार प्रकाश तीपाणावर यांनी मानले.