अजित पवार यांची मुख्यमंत्री पदापासून माघार पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस असणार!
(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त)
महाराष्ट्र राज्यातील प्रचार सभेचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगून राजकीय भूकंप निर्माण केला आहे. आपल्याला 90 जागा लढायच्या आणि सत्तेत यायचं आहे असा दावा अजितदादा यांनी केला होता परंतु एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी परिस्थिती बदलल्यामुळे आता मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले आहे. आता निवडणुकीची धामधूम चाललेली आहे आम्ही युती केलेली आहे युतीमध्ये पहिलं टार्गेट आमचे हे आहे की, “पावणेदोनशे पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणायच्या आणि मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यातला नेता निवडू.”
प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रांमध्ये तुम्ही ज्या वेळेस काम करत असता त्यावेळेस दोन पावलं पुढं मागं तुम्हाला सरकावच लागतात, कॉम्प्रमाईज करावाच लागते, जो तडजोड करतो तोच माणूस पुढे यशस्वी होतो. आमच्या दृष्टीने महायुतीचं सरकार राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून द्यावं हा आमचा सध्या मुख्य अजेंडा आहे असे ही अजितदादा पवार यांनी सांगितले. शरद पवार हे राज्यातील नव्हे तर देशातील एक मोठे नेते आहेत त्यांचा वारसदार कोण? हे जनता ठरवेल. महाराष्ट्रातील एका प्रचार सभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार बनेल अशी ग्वाही दिली. अमित शहा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाने नमस्कार राज्यातील सत्तेत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व येऊन ते पुन्हा येतील या विधानाला पृष्टी मिळत आहे.