इचलकरंजी –
आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे हे सदैव मराठा समाजासोबत प्रत्येक आंदोलनात व कामात भक्कमपणे पाठीशी राहिले आहेत. महायुती सरकारने दिलेले आरक्षण महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. त्यामुळेच इचलकरंजीतील मराठा समाजाने महायुतीच्या म्हणजेच राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यात मराठा समाज अग्रभागी असेल, अशी ग्वाही देत राहुल आवाडे यांना बिनशर्त पाठींबा देण्यात आला.
279-इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने राहुल प्रकाश आवाडे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना सर्वच स्तरातून आणि विविध समाजातून पाठींबा मिळत आहे. त्यामध्ये आता मराठा समाजानेही पुढाकार घेत राहुल आवाडे यांना पाठींबा जाहीर केला आहे. राज्यात काँग्रेसच्या सत्ता काळात आठ मुख्यमंत्र्यांनी आरक्षण संदर्भात केवळ आश्वासने दिली. पण प्रश्न सोडवता आला नाही. परंतु महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले. त्यानंतर सत्ता बदल होऊन महाविकास आघाडीला ते सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आले नाही. या रागापोटीच मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी व हिंदुत्वाच्या आणि महायुतीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
राहुल आवाडे यांनी या पाठबळाबद्दल आभार व्यक्त करताना मराठा समाजाच्या विविध प्रश्नात मी सदैव पाठीशी राहून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिन अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी पुंडलिकभाऊ जाधव, पै. अमृतमामा भोसले, मोहन मालवणकर, संतोष सावंत, संजय जाधव, प्रसाद जाधव, भारत बोंगार्डे, राजेंद्र बचाटे, मंगेश मस्कर, शहाजी भोसले, नागेश पाटील, किसन शिंदे, संतोष चव्हाण, सचिन घाटगे, शशिकांत मोहिते, दीपक रावळ, सागर कचरे, सचिन लायकर, युवराज बोने-पाटील, राजू देसाई, हिरूगडे मामा, अजित खुडे, संजय चोपडे, सतीश मुळीक, दत्ता मांजरे, दिलीप झोळ, सुनील पोवार, प्रमोद बचाटे, नारायण दुरूगडे, किरण पोवार, कृष्णा निकम, धनंजय पाटील, रामचंद्र भोसले, प्रशांत नवनाळे, स्वप्निल कुळवमोडे, गणेश नेमिष्टे, अरुण मस्कर, उदय निकम, युवराज पाटील, दत्ता पाटील, अवधुत मुडशिंगीकर, सतिश घोरपडे, धनाजी मोरबाळे, प्रशांत चौगुले, उदय तिरपणकर, प्रितम नलवडे विनायक अंबिलढोक, हिंदुराव अडेकर, संतोष दुरूगडे, हेमंत पाटील, भिमराव कोकणे, नेताजी बिरंजे, प्रदीप लायकर यांच्यासह इचलकरंजी परिसरातील असंख्य मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
मराठा समाजाचा महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना जाहीर पाठींबा
