टार्गेट पब्लिकेशन्सचे ऐतिहासिक यश : एससीईआरटी (SCERT) कडून ८ अभिनव पुस्तकांना मान्यता.
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईतील नामांकित शैक्षणिक प्रकाशन संस्था टार्गेट पब्लिकेशन्स प्रा. लि. यांच्या अभूतपूर्व यशामुळे शैक्षणिक प्रकाशन क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (SCERT), पुणे यांनी टार्गेट पब्लिकेशन्सच्या ८ पुस्तकांना मान्यता दिली असून यामुळे टार्गेट पब्लिकेशन्स ही विद्यार्थी केंद्रित शिक्षण मिळवून देणारी संस्था आहे, यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
एससीईआरटी , महाराष्ट्र यांद्वारे मान्यता प्राप्त इयत्ता दहावीची आठ पुस्तके :
मान्यताप्राप्त पुस्तकांमध्ये पुढीलप्रमाणे विविध विषयांचा समावेश आहे.
• Geography Map and Graph Practice Book (English Medium) – Std. 10
• भूगोल – नकाशा व आलेख सराव पुस्तिका (मराठी माध्यम) – इयत्ता १० वी
• Mathematics Challenging Questions (English Medium) – Std. 10
• English (HL) – Grammar and Vocabulary – Std. 10
• English (HL) – Writing Skills – Std. 10
• हिंदी – व्याकरण व शब्दसंपदा – कक्षा दसवीं
• हिंदी – उपयोजित लेखन – कक्षा दसवीं
• मराठी (LL) – व्याकरण-भाषाभ्यास व उपयोजित लेखन – इयत्ता १० वी
SCERT द्वारे टार्गेट पब्लिकेशन्सची प्रशंसा:
या यशाबरोबरच एससीईआरटी, महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी टार्गेट पब्लिकेशन्सच्या वरिष्ठ लेखिका श्रीमती. मेघना जाधव यांच्या ‘भूगोल नकाशा व आलेख सराव पुस्तिका’ यासंबंधीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. या पुस्तकाच्या नाविन्यपूर्ण रचनेमुळे हे पुस्तक परस्परसंवादी, प्रात्यक्षिक शिक्षणाला प्रोत्साहन देते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना भौगोलिक संकल्पना समजणे सोपे होते. एससीईआरटीच्या अधिकृत संदेशामध्ये या पुस्तकास शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक परिवर्तनकारी शैक्षणिक संसाधन म्हणून अधोरेखित करण्यात आले आहे.
या अतुलनीय कामगिरीबद्दल बोलताना, टार्गेट लर्निंग व्हेंचर्सचे (पूर्वीचे टार्गेट पब्लिकेशन्स प्रा. लि.) संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप गंगारमानी, यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “हे यश म्हणजे स्वप्नपूर्ती आहे. आमची आठ पुस्तके SCERTने मंजूर करणे आणि विद्यार्थ्यांना त्या पुस्तकांची शिफारस करणे, हा आमच्यासाठी बहुमोल असा सन्मान आहे. टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे नेहमीच प्रभावी तसेच प्रेरणादायी आणि आकर्षक पुस्तके व शैक्षणिक साहित्य तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. या यशामुळे, देशभरातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची आणि विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनविण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित होते.”
या यशासह, टार्गेट पब्लिकेशन्सने देशभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास हा रोमांचक आणि समृद्ध बनविण्यासाठी आपले कार्य अविरत सुरू ठेवले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन घडविणे, हे ध्येय टार्गेट पब्लिकेशन्सने गाठलेल्या प्रत्येक टप्प्यामागील प्रेरणा आहे.