बेकायदेशीर मद्य विक्री प्रकरणी खिंडी व्हरवडेतील हॉटेलवर कारवाई ;एक्साईज कडून सहाजणांना अटक

बेकायदेशीर मद्य विक्री प्रकरणी खिंडी व्हरवडेतील हॉटेलवर कारवाई ;एक्साईज कडून सहाजणांना अटक

बेकायदेशीर मद्य विक्री प्रकरणी खिंडी व्हरवडेतील हॉटेलवर कारवाई

एक्साईज कडून सहाजणांना अटक

अमोल कुरणे

कोल्हापूर, दि. १८ (प्रतिनिधी)
राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे येथे बेकायदेशीर देशी-विदेशी मद्य विक्री करणाऱ्या ओमसाई हॉटेलवर एक्साईज विभागाने कारवाई केली. हॉटेलच्या मालकासह सहाजणांना अटक केली,असून त्यांच्याकडून एकूण ९ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हॉटेल मालक अनिल दादू पाटील रा. कौलव, ता. राधानगरी, मद्यपी सूरज बळवंत माळवी रा. गुडाळ, ता. राधानगरी, वैभव चंद्रकांत पताडे रा. बनाचीवाडी, ता. राधानगरी, तानाजी आनंदा गुरव, मारुती रामचंद्र गुरव दोघे रा. खिंडी व्हरवडे, गणेश मारुती पाटील रा. आणाजे यांना अटक करून सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हॉटेल मालक अनिल पाटील याला २५ हजारांचा दंड केला व दंड न भरल्यास १४ दिवस साधी कैद आणि मद्यपींना प्रत्येकी १५०० रुपये दंड ठोठावला. हा दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद सुनावली. या सर्वांनी दंडाची रक्कम न्यायालयात भरणा केली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता श्रीकर – नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कागल विभागाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक, कागल क्र. २ चे रमेश चंदुरे, फिर्यादी लक्ष्मण येडगे, दुय्यम निरीक्षक कागल क्र. १ पथकातील प्रशांत नागरगोजे, जवान सचिन काळेल, केतन दराडे यांनी केली. यावेळी राधानगरी पोलीस स्टेशनचे सहकार्य झाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *