बांधकाम कामगार कार्यालय व कै. लक्ष्मण पोवार यांचे स्मरणार्थ वाचनालयाचे उद्घाटन
फोटो –
इचलकरंजी/प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकूंदराव पोवार यांच्या वतीने सुरु केलेले बांधकाम कामगार कार्यालय आणि हिरा-शाम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष कै. लक्ष्मण पोवार यांच्या स्मरणार्थ सुरु केलेले वाचनालय उद्घाटन आमदार राहुल आवाडे आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
इचलकरंजी शहर व परिसरातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने तसेच कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकूंदराव पोवार यांनी बांधकाम कामगार कार्यालय सुरु केले आहे. तर आजच्या स्पर्धात्मक युगात स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन व आवश्यक पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी हिरा-शाम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष कै. लक्ष्मण पोवार यांच्या स्मरणार्थ वाचनालय सुरु करण्यात आले आहे.
यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी, शिक्षण आणि श्रमिक कल्याण ही समाजाच्या प्रगतीची महत्त्वाची साधने आहेत. बांधकाम कामगारांसाठी हे कार्यालय त्यांना त्यांच्या हक्कांसाठी आधार ठरेल तर वाचनालय नव्या पिढीला ज्ञानाच्या वाटेवर जाण्यास प्रेरित करेल. बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याचबरोबर भटक्या समाजाच्या जातीचे दाखले तातडीने उपलब्ध व्हावेत यासाठी मी शासन दरबारी प्रयत्नशील राहिन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष प्रमोद पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत अनिल कदम यांनी केले. प्रास्ताविकात मुकूंद पोवार यांचा कार्यालय सुरु करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चांदणे यांनी केले. आभार संजय माने यांनी मानले.
याप्रसंगी पै. अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, रुबन आवळे, बाळासाहेब कलागते, भाऊसो आवळे, रवी जावळे, राजू बोंद्रे, मोहन काळे, संजय केंगार, जयेश बुगड, लक्ष्मण तोडकर, रमेश पाटील, कोंडीबा दवडते, नरसिंह पारीक, महावीर कुरुंदवाडे, जयसिंग पाटील, शरद करंबे, रमेश साळुंखे, हुलगप्पा वडर, सौ. सुमन पोवार, आक्काताई आवळे, ध्रुवती दळवाई, उर्मिला गायकवाड, अरुणा शहा, अर्चना कुडचे, मेघा भाटले, नौशाद जावळे, अरुण निंबाळकर, संजय मोहिते, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत कोष्टी, चंद्रकांत पाटील, रवी मीणेकर, प्रथमेश पोवार यांच्यासह बांधकाम कामगार व भागातील नागरिक उपस्थित होते.