डॉ.जे.जे.मगदूमच्या सिव्हिल विभागतील सहा विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड
( वर्ग २अधिकारी,नगररचना,वॉटर रिसोर्स,जूनियर इंजिनियर, दुय्यम अभियंता)
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल विभागातील सहा जणांची शासकीय सेवेत निवड झाली आहे.
कु. शिवराज ठोंबरे, वर्ग २ अधिकारी वॉटर सप्लाय अँड सेनेटेशन, मयूर आवळे, नगररचना सहाय्यक, सुरज तडस ज्युनिअर इंजिनियर, अनिल मुडशी व श्रद्धा पाटील, दुय्यम अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रसन्ना कुंभार जुनिअर इंजिनियर वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट. या विद्यार्थ्यांची २०२४-२५ मध्ये शासकीय सेवेत निवड झाली आहे.
सिव्हिल विभागामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय सेवेच्या संधी असतात त्यामुळे ३३ वर्षाच्या शैक्षणिक अनुभवाच्या शिदोरी मधून बाहेर पडलेले महाविद्यालयाचे शासकीय सेवेतील अधिकारी यांच्या भेटीगाठी घडवून आनणे, मार्गदर्शन शिबिर आयोजन, ग्रंथालया मधून शासकीय सेवा भरती पुस्तके व जर्नल उपलब्ध करून देणे,अभ्यासिका व नवीन धोरनात्मक अभ्यासक्रमास धरून मार्गदर्शन केले जाते त्यामुळे शासकीय सेवेत नोकरी करण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे काम महाविद्यालय करत आहे. अनुभवी प्राध्यापकांचेअचूक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी पडते.
भविष्यात १००% प्लेसमेंट सोबतच विद्यार्थ्यांच्या शासकीय सेवेतील यशाबाबत महाविद्यालय प्रयत्नशील राहील असा विश्वास ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी दिला. नवीन तंत्त्राधिष्टीत अभ्यासक्रमाचे अधीन राहून विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांमध्ये महाविद्यालय कुठेही कमी पडणार नाही असा निश्चय एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी व्यक्त केला. विभाग प्रमुख डॉ.जे. एस. लंबे व अनुभवी प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
Posted inकोल्हापूर
डॉ.जे.जे.मगदूमच्या सिव्हिल विभागतील सहा विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड
