जालन्यात उद्या भव्य जनआक्रोश मोर्चा: विलास लोंढे हत्या आणि संजय वैरागरवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ सकल मातंग व आंबेडकरी समाज एकवटला!
जालना: मातंग समाजाचा तरुण कार्यकर्ता विलास प्रकाश लोंढे याची झालेली निर्घृण हत्या आणि अहिल्यानगर सोनई येथील संजय वैरागर या तरुणावर झालेले अमानुष अत्याचार, या मागासवर्गीय व दलित समाजावरील वाढत्या अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ सकल मातंग समाज आणि आंबेडकरी समाजाने जालना येथे उद्या, रविवार दिनांक २६/१०/२०२५ रोजी दुपारी १ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
- विलास लोंढे यांची निर्घृण हत्या: मातंग समाजाचे तरुण कार्यकर्ते विलास प्रकाश लोंढे यांची दहा ते पंधरा जणांनी मिळून निर्घृण हत्या केली.
- संजय वैरागरवर अमानुष अत्याचार: अहिल्यानगर सोनई येथील संजय वैरागर या तरुणाला मनुवादी आणि जातीवादी वृत्तीच्या समाजकंटकांनी अमानुष मारहाण केली. आरोपींनी त्याच्या अंगावर गाडी घालून पाय तोडले, डोळ्यामध्ये चाकू खुपसून त्याला कायमचे अंध केले, तसेच त्याच्यावर लघवी करून व थुंकून अमानुष अत्याचार केले.
मोर्चाची मागणी:
मातंग समाज आणि आंबेडकरी समाजाने या सर्व घटनांचा तीव्र निषेध केला असून, राज्य शासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. मोर्चातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: - विलास लोंढे हत्या आणि संजय वैरागरवर अत्याचार करणाऱ्या समाजकंटक व गुन्हेगारांवर ‘मोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी.
- गुन्हेगारांची भर शहरातून दिंड काढून कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी.
- मागासवर्गीय व दलित समाजावरील अन्याय-अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत.
मोर्चात सामील होण्याचे आवाहन
मातंग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ यांनी सर्व मातंग समाज व आंबेडकरी समाजाने या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन केले आहे. यावेळी मातंग आणि आंबेडकरी समाजाचे नेते संजय बाबा गायकवाड आणि संदीप खरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
स्थान: पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना
वेळ: रविवार, २६/१०/२०२५, दुपारी १ वाजता.

