‘संविधान, लोकशाही संवर्धन महामोर्चा’ कोल्हापुरात! न्या. भूषण गवईंच्या अवमानाच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यात बैठकांचा जोर; २७ ऑक्टोबरला बिंदू चौकातून निघणार धडकी भरणारा मोर्चा
हातकणंगले: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेब यांच्या कथित अवमानाचा निषेध करण्यासाठी आणि भारतीय संविधान व लोकशाहीच्या संवर्धनासाठी कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीतून राज्यभर आवाज पोहोचवण्यासाठी, सोमवार दिनांक २७/१०/२०२५ रोजी कोल्हापूर येथील ऐतिहासिक बिंदू चौकातून धडकी भरणारा ‘संविधान लोकशाही संवर्धन महामोर्चा’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर, महामोर्चाच्या नियोजनासाठी रविवार दिनांक २०/१०/२०२५ रोजी हातकणंगले तालुका येथील समस्त बौद्ध विहारात तालुकास्तरीय बैठक उत्साहात पार पडली.
न्यायमूर्ती गवईंच्या अवमानाचा निषेध:
निवेदक मा. अशोक हातकणंगलेकर आणि विद्याधर कांबळे (हुपरी) यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या मते, न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांचा झालेला अवमान हा केवळ एका व्यक्तीचा नसून, तो देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा, भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा अवमान आहे. या निषेधार्थ कोल्हापुरातून एकत्रित आवाज उठवून तो राज्यभर पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
संविधानासाठी संघटित राहण्याची गरज:
या बैठकीला हातकणंगले तालुक्यातील आंबेडकरी व समविचारी पक्ष-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. भविष्यात आपल्या समाजासाठी, विशेषतः जातीसाठी किती वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते, यावर चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे संघटित राहणे किती गरजेचे आहे आणि संविधान वाचवणे किती महत्त्वाचे आहे, यावर सर्वांनी भर दिला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावातून जास्तीत जास्त भीम सैनिक मोर्चात घेऊन येण्याचे अभिवचन दिले.
बैठकीला प्रमुख उपस्थिती:
या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी निमंत्रक अशोक हातकणंगलेकर आणि विद्याधर कांबळे यांच्यासह बैठकीचे अध्यक्ष प्राध्यापक चोकाककर सर, चंद्रकांत सूर्यवंशी साहेब, प्रा. शहाजी कांबळे, जीरंगे साहेब, बी. के. कांबळे, सुजित समुद्रे, सुरेश सावडेकर, डॉक्टर सुभाष मधाळे, आनंदराव कांबळे, बाजीराव नाईक, प्रसाद सूर्यवंशी, जेके गायकवाड, बाळासो कांबळे, कौतुक कांबळे, विशाल साजणीकर, प्रमोद सूर्यवंशी, प्रमोद कदम, दीपक भोसले, संदीप साबळे सर, सुभाष माने (तिळवणी), आनंदराव कांबळे (हुपरी), अनिल धनवडे (शिंगणापूर), विनय कांबळे, सुहास कांबळे (पेठवडगाव), नितीन नेजकर (शिवपुरी), अमित मेधावी (मिणचे), सुरेश कांबळे (नागाव), प्रथमेश देसाई, सतीश मोरे (पेठ वडगाव), विनोद कांबळे (इंगळे), संजय निकाळजे, योगेश कांबळे, मोहीम दिगाडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजकांनी हातकणंगले तालुक्यातील हजारो भीम सैनिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक इत्यादींनी २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
Posted inकोल्हापूर
संविधान, लोकशाही संवर्धन महामोर्चा’ कोल्हापुरात! न्या. भूषण गवईंच्या अवमानाच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यात बैठकांचा जोर; २७ ऑक्टोबरला बिंदू चौकातून निघणार धडकी भरणारा मोर्चा

