बार्टीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन साताऱ्यात उत्साहात साजरा! समता रॅली, काव्यसंमेलन व ग्रंथ प्रदर्शनातून महामानवाला अभिवादन

बार्टीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन साताऱ्यात उत्साहात साजरा! समता रॅली, काव्यसंमेलन व ग्रंथ प्रदर्शनातून महामानवाला अभिवादन

📰 बार्टीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन साताऱ्यात उत्साहात साजरा! समता रॅली, काव्यसंमेलन व ग्रंथ प्रदर्शनातून महामानवाला अभिवादन 🇮🇳


सातारा: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी शाळा प्रवेश दिनानिमित्त (विद्यार्थी दिन) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह भोसले शाळेत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व सामाजिक न्याय खात्याचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.


🏫 साताऱ्यातील ऐतिहासिक शाळेत विद्यार्थी दिनाची धामधूम
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिन’ म्हणून छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, जुना राजवाडा, सातारा येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले, परिविक्षाधीन मुख्याधिकारी प्रज्ञाशील वाघमारे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, शाळेचे मुख्याध्यापक देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.
📢 बार्टी महासंचालकांचा संशोधन प्रकल्पाचा मानस
बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशासंबंधातील सर्व दस्तऐवज एकत्रित करून एक संशोधन प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केला. तसेच, लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाच्या धर्तीवर शासनाच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ‘आंबेडकर रूम’ करण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.
पुणे मुख्यालयातही अभिवादन
याच निमित्ताने बार्टी मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महासंचालक सुनील वारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी सांगली अध्यक्ष श्रीमती सरिता नरके, बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, विभाग प्रमुख अनिल कारंडे, मारुती बोरकर, वृषाली शिंदे, नितीन चव्हाण व बार्टीतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली खांडेकर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी केले.


📚 ग्रंथ प्रदर्शन, समता रॅली आणि ‘कविता बाबासाहेबांच्या’

  • ग्रंथ संपदा: बार्टीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ, पुस्तके सवलतीच्या दरात बुक स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आली होती. भीम अनुयायी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथ खरेदी करून महामानवास अभिवादन केले.
  • समता रॅली: विद्यार्थी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी समता रॅली द्वारे संविधानाच्या सामाजिक समतेच्या मूल्यांचा नाम फलकाद्वारे संदेश दिला. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी, मान्यवर, नागरिक सहभागी झाले होते.
  • काव्यसंमेलन: “कविता बाबासाहेबांच्या” या प्रबोधनात्मक काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रा. रमणी बबीता आकाश, नितीन चंदनशिवे, प्रा. सुमित गुणवंत, बबन सरोदे, रमेश बुरबुरे, संदेश शालिनी संभाजी कर्डक, गजानन गावंडे, सुदेश जगताप, आकाश आप्पा सोनवणे या नामवंत कवींनी सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला काव्यातून वंदन केले.
    बार्टी संस्थेच्या मध्यमातून समतादुत विभागाच्यावतीने संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सातारा येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समतादुत विभागाचे प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *