नारायण कांबळे
इचलकरंजी : येथील तारदाळ परिसरात एका अल्पवयीन बालिकेवर (वय ८.५ वर्षे) किराणा दुकान चालवणाऱ्या व्यक्तीने गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिस्किटे, चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आरोपीने हे घृणास्पद कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडितेच्या पालकांनी धाडसाने शाहपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
घटनेचा तपशील:
गुन्हा रजि. क्र. : 409/2025
कलमे: भा.दं.वि. कलम 74, 78, 79, 351(3) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, 2012 (POCSO Act) चे कलम 12
आरोपी: . दशरथ बाबू सोनटक्के, चौडेश्वरी कॉलनी, तारदाळ, ता. हातकणंगले.
पीडिता: अंदाजे 8 वर्षे 6 महिने 11 दिवस (जन्म: 21/05/2017).
घटनास्थळ: आरोपीचे किराणा दुकान, दशरथ बाबू सोनटक्के, वॉर्ड क्र. 60, तारदाळ.
नेमके काय घडले?
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दशरथ हा किराणा दुकान चालवतो. त्याने मागील सहा महिन्यांपासून सातत्याने पीडित अल्पवयीन मुलीला लक्ष्य केले. बिस्किटे, गोळ्या आणि चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तो तिला वारंवार दुकानात बोलवत असे. या संधीचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता आरोपीने पुन्हा हे कृत्य केले
गुन्हा उघडकीस
हे संपूर्ण प्रकरण उघड झाल्यावर पीडितेच्या पालकांनी आरोपीकडे विचारणा केली. तेव्हा आरोपीने, “आजून काही केले नाही केल्यावर तुम्ही काय करणार आहात” असे उद्धट आणि उद्दाम उत्तर दिले. या उत्तराने संतप्त झालेल्या पालकांनी तात्काळ शाहपुर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म.पो.हे.कॉ. साबळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
