नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड 2025 भव्य सोहळा — गोवा येथे पार पडला
कलंगुट, गोवा – प्रतिष्ठित “नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड 2025” हा भव्य पुरस्कार सोहळा हॉटेल नीलम द ग्रँड, कलंगुट – गोवा येथे अत्यंत दिमाखात पार पडला. सामाजिक कार्य, मानवतावादी मूल्ये व जागतिक शांतता या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते —
मा. श्री. सुभाष फलदेसाई (सामाजिक कल्याण व नदी वाहतूक, अभिलेखागार आणि पुरातत्व मंत्री, गोवा शासन),
मा. हर हायनेस अरशी जवेरी (सिनियर अडव्हायझर टू रॉयल फॅमिली ऑफिसेस, यूएई आणि CEO – ट्रस्ट ट्रेड ग्रुप),
तसेच मल्टिप्रेन्योर श्री. रॉबिन अल्मेडा, CEO – RAWNE.
त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख सन्मानाचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड 2025 प्रतिष्ठित M/S सुर्वणवेद फार्मास्युटिकल यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक डॉ. शिवानंद कुंभार व सौ. स्नेहा शिवानंद कुंभार यांनी हा पुरस्कार स्विकारला. आयुर्वेद क्षेत्रात संशोधन, नवकल्पना, ग्रामीण महिलांना रोजगार, तसेच मानव आरोग्यसेवा व जागतिक पातळीवर प्राचीन भारतीय आयुर्वेदाचा प्रसार यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी मानवतावाद, सामाजिक योगदान आणि आरोग्य-सेवेतील भारतीय परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.
डॉ. शिवानंद कुंभार यांनी सन्मान स्विकारताना सांगितले की:
“हा पुरस्कार भारताच्या आयुर्वेद परंपरेला समर्पित आहे. आमचे ध्येय संपूर्ण जगात आयुर्वेद सुलभ, वैज्ञानिक व परवडणाऱ्या स्वरूपात पोहोचवणे आहे.”
सोहळ्याला देश-विदेशातील मान्यवर, उद्योजक, वैद्यकीय तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. कार्यक्रम वातावरणात उत्साह, आनंद व सन्मानाची भावना भरून राहिली.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
—✦✦✦✦✦—
विशेष अभिनंदन:
M/S Suvarnved Pharmaceutical – डॉ. शिवानंद कुंभार व सौ. स्नेहा शिवानंद कुंभार यांना हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व उत्तरोत्तर प्रगतीच्या हार्दिक कामना.

