विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सुयोग पत्रकार निवासस्थानी सदिच्छा भेट
नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी सुयोग विश्रामगृह येथील पत्रकार निवासस्थानी भेट देत पत्रकारांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी विविध मुद्यांवरील प्रश्न मोकळेपणाने विचारले व डॉ. गोऱ्हे यांनीही त्यांची सविस्तर उत्तरे देत दिलखुलास संवाद साधला.
पत्रकारांशी मैत्रीपूर्ण वातावरणात झालेल्या या गप्पागोष्टीदरम्यान महिला सक्षमीकरण, महिलांवरील वाढते अत्याचार, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, हुंडाबळी, घरगुती हिंसाचार अशा विविध सामाजिक मुद्द्यांवर डॉ. गोऱ्हे यांनी सखोल चर्चा केली. या समस्यांच्या निराकरणासाठी चालू उपक्रम, तरतुदी आणि पुढील दिशा याबाबत त्यांनी माहिती दिली.
या भेटीला विधिमंडळ मान्यताप्राप्त पत्रकारांसह विविध माध्यमांतील वरिष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
