मजले हातकणंगलेच्या मुख्य रस्त्याची दैनिय अवस्था.
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर मजले ग्रामस्थ बहिष्कार टाकतील – आशिष कोठावळे.
हातकणंगले
मजले ता. हातकणंगले येथील तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. रस्त्यावर अनेक मोठे मोठे खडे पडले आहेत. त्यावरून वाहतूक करणे खुप कठीण झाले आहे.
अनेक छोटे मोठे अपघात होईन अपघाताची मालिका सुरूच आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा लेखी पत्र व्यावहार केला असूनही रस्ता होईल की नाही कोणीही सांगू शकत नाही. मजले सारख्या छोट्या गावाकडे तालुक्यातील लोकप्रीतनिधी लक्ष देणार का.? अशी शंका निर्माण झाली आहे. ह्या रस्त्यामुळे अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष घालून मजले ते हातकणंगले हा मुख्य रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अन्यथा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर मजले गाव बहिष्कार टाकेल असा इशारा स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आशिष कोठावळे यांनी दिला आहे.
