हातकणंगले नगरपंचायतीच्या नूतन नगरसेवकांचा पॅंथर आर्मी व आधार फाउंडेशनतर्फे गौरव
हातकणंगले:
हातकणंगले नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आणि नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आणि आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नूतन नगरसेवक दिपाली सागर कांबळे, निशा सागर कांबळे आणि सचिन दादासो बोराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. निवडून आलेल्या या लोकप्रतिनिधींनी येणाऱ्या काळात जनहिताची कामे प्रभावीपणे करावीत आणि शहराच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी आठवले साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, तालुका महिला अध्यक्ष सोनाबाई, तालुका महिला उपाध्यक्ष माधुरी कांबळे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान आधार फाउंडेशन आणि पॅंथर आर्मीच्या वतीने नूतन नगरसेवकांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करण्यात आले.
