अवैध मद्यवाहनासह २ कोटीचा मुद्देमाल जप्त : मध्यप्रदेशातील एकास अटक

अवैध मद्यवाहनासह २ कोटीचा मुद्देमाल जप्त : मध्यप्रदेशातील एकास अटक

अवैध मद्यवाहनासह २ कोटीचा मुद्देमाल जप्त : मध्यप्रदेशातील एकास अटक

एक्साईज कोल्हापूर विभागीय भरारी पथक व सातारा विभागाची संयुक्त कारवाई

लोणंद येथे १५०६ बॉक्स परराज्यातील विदेशी दारूचा १४ चाकी ट्रक पकडला

कोल्हापूर, दि. २० (अमोल कुरणे) कोल्हापूर विभागीय भरारी पथक व सातारा भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करत परराज्यातील अवैध मद्य तस्करी उधळून लावली. सातारा-निरा रोडवर लोणंद बस स्टँड समोर, ता. खंडाळा, जि. सातारा येथे पाळत ठेवून महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. गोवा राज्य निर्मित व मध्यप्रदेश राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्य प्लॅस्टिक सिरॅमिकच्या १५० गोण्यांच्या आड लपवून अशोक लेलॅंड कंपनीचा १४ चाकी ट्रक क्र. एम.एच. १२ एम.व्ही. ४७९ मधून वाहतूक करताना पथकाने रंगेहात पकडला. जप्त केलेल्या मुद्देमालात पोलंड प्राईड व्हिस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ८३४ बॉक्स तसेच रॉयल क्लासिक माल्ट व्हिस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ६७२ बॉक्स असा एकूण १५०६ बॉक्स विदेशी मद्याचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील या मद्याची किंमत १,७१,०४,३२० रुपये असून ट्रक व इतर मुद्देमालासह एकूण २,०,९४,३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आसाम नगर, इंदोर, राज्य मध्यप्रदेश येथील महमंद शफीक रशीद शहा वय ३९ याला महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमान्वये अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख व सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार व राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे व मार्गदर्शनाखाली सातारा अधीक्षक बाबासाहेब भुतकर, निरीक्षक माधव चव्हाण व निरीक्षक किरण पवार यांनी ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक योगेश फटांगरे करत असून फिर्यादी सुहास शिरतोडे आहेत. या कारवाईत दुय्यम निरीक्षक अजय पाटील, विजय मरोड, कैलास छत्रे, जवान विनोद हिंगोणे, अजित रसाळ, नंदू कलकुटगी, सुरेश आंबागिरी, आबासाहेब जानकर, अजित घाडगे, जीवन शिके, मारुती पवार, विशाल आळतेकर, योगेश शेलार यांनी सहभाग घेतला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *