अनुसूचित जातीच्या हक्काचा ३१९ कोटींचा निधी वळवल्याप्रकरणी ‘पॅथर आर्मी’चा तीव्र संताप; शासनाच्या निर्णयाविरुद्ध राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

अनुसूचित जातीच्या हक्काचा ३१९ कोटींचा निधी वळवल्याप्रकरणी ‘पॅथर आर्मी’चा तीव्र संताप; शासनाच्या निर्णयाविरुद्ध राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

अनुसूचित जातीच्या हक्काचा ३१९ कोटींचा निधी वळवल्याप्रकरणी ‘पॅथर आर्मी’चा तीव्र संताप; शासनाच्या निर्णयाविरुद्ध राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

कोल्हापुर / प्रतिनिधी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी राज्य शासनाकडून सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती (SC) घटकातील महिलांसाठी असलेला तब्बल ३१९ कोटी ५३ लाखांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयावर पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या सामाजिक संघटनेने तीव्र आक्षेप घेतला असून, मागासवर्गीय घटकांच्या हक्काचा निधी इतरत्र वळवणे हा संवैधानिक अधिकारांवर मोठा आघात असल्याचा घणाघाती आरोप संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा आठवले यांनी केला आहे.

वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या निर्णयावर आपली आक्रमक भूमिका स्पष्ट करताना संतोषदादा आठवले म्हणाले की, पॅथर आर्मी कधीही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या विरोधात नाही, परंतु इतर मागासवर्गीय व दलित घटकांच्या हक्काचा आणि विकासासाठी राखीव असणारा निधी अशा प्रकारे परस्पर डायव्हर्ट करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

सामाजिक न्याय विभागाचा निधी अशा प्रकारे इतरत्र वळवल्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहे, कौशल्य विकास आणि अन्य महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आधीच हक्काच्या निधीसाठी संघर्ष करावा लागत असताना, आता तो उपलब्ध निधीही अन्य योजनेसाठी वापरल्यामुळे मूळ घटकांच्या विकासाला खिळ बसणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शासनाकडे तातडीची मागणी व आंदोलनाचा इशारा शासनाने मागासवर्गीय घटकांच्या विकासाचा निधी इतर योजनांसाठी वळवणे तात्काळ थांबवावे आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी केवळ आणि केवळ संबंधित घटकांच्या हक्कासाठीच पूर्णपणे सुरक्षित ठेवावा, अशी मागणी पॅथर आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे. जर शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा आठवले यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *