शिरोळ तालुक्यात ‘इंटक’च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा आणि नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न
शिरोळ (प्रतिनिधी) : भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या शिरोळ तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख मा. गणपतराव दादा पाटील साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि शिरोळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री. दरगू गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कामगारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी ही नवी कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
इंटकची नवनिर्वाचित कार्यकारिणी खालीलप्रमाणे :
- श्री. प्रमोद पाटील (नरंदेकर) – कोल्हापूर जिल्हाध्यक्ष
- श्री. जितेन्द्र चाऊस – शिरोळ तालुका अध्यक्ष
- श्री. अरुण पाटील – तालुका उपाध्यक्ष
- श्री. तानाजी गावडे – तालुका उपाध्यक्ष
- श्री. रामचंद्र माने – तालुका उपाध्यक्ष
- श्री. दीपक माने – सचिव
मान्यवरांची विशेष उपस्थिती
या सोहळ्यास कामगार व सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
- ताजुद्दीन खतीब साहेब (जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ – इंटक)
- श्री. रघुनाथ पाटील साहेब (चेअरमन, श्री दत्त साखर कारखाना)
- श्री. शरदचंद्र पाठक साहेब (व्हाइस चेअरमन, श्री दत्त साखर कारखाना)
- श्री. प्रदीप उर्फ बाळासाहेब बणगे (अध्यक्ष, दत्त साखर कारखाना कामगार युनियन)
- श्री. चंद्रशेखर कलगी (सहसचिव, युनियन)
- नासिर गवंडी (जिल्हा उपाध्यक्ष)
- मंजूर मुलतानी (इचलकरंजी शहर उपाध्यक्ष)
यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
