स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न; ​परिवर्तन फाउंडेशन व न्याय निवाडा चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न; ​परिवर्तन फाउंडेशन व न्याय निवाडा चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न

परिवर्तन फाउंडेशन व न्याय निवाडा चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

कोल्हापूर, प्रतिनिधी :

देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीची भावना जागवणारा विशेष कार्यक्रम लक्ष्मीपुरी येथील रिलायन्स मॉलच्या सहकार्याने परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

​कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. धनंजय पठाडे आणि पोलीस निरीक्षक हेमा पाटील यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले. प्रारंभी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

​यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. धनंजय पठाडे म्हणाले, “स्वातंत्र्य टिकवणे आणि समृद्ध करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात शांतता, कायद्याचे पालन आणि सामाजिक एकात्मता टिकवून ठेवणे हेच खरे देशप्रेम आहे. तरुणांनी देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा.”

​पोलीस निरीक्षक हेमा पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “देशाची सुरक्षा, अंतर्गत शिस्त, कायदा-सुव्यवस्था राखण्यात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून राष्ट्र उभारणीत आपले योगदान दिले पाहिजे.”

​कार्यक्रमासाठी न्याय निवाडा चॅरिटेबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत दिंडे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध गायक पी. कुमार, डी. जी. कुलकर्णी, ज्येष्ठ गायिका विद्या पाटील आणि अजित रणवरे आदी कलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *