मगांधीजींच्या विचारांचे वैश्विक महत्त्व समजून घेण्याची गरज – ॲड. धनंजय पठाडे

मगांधीजींच्या विचारांचे वैश्विक महत्त्व समजून घेण्याची गरज – ॲड. धनंजय पठाडे

म

गांधीजींच्या विचारांचे वैश्विक महत्त्व समजून घेण्याची गरज – ॲड. धनंजय पठाडे

कोल्हापूर, दि. २ (प्रतिनिधी)
महात्मा गांधी हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून, ते जागतिक शांततेचे आणि मानवी मूल्यांचे वैश्विक प्रतीक आहेत. त्यांच्या अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या विचारांनी नेल्सन मंडेला आणि मार्टिन लूथर किंग यांच्यासारख्या जागतिक नेत्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे मोठे बळ दिले. आजच्या आधुनिक युगातही जगासमोरील अनेक क्लिष्ट समस्यांवर गांधीवाद हाच एकमेव आणि सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईने गांधीजींच्या विचारांचे वैश्विक महत्त्व समजून घेण्याची गरज आहे, असे मत ॲड. धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.
पापाची टिकटी येथे महात्मा गांधी जंयती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला एक्साईजचे वरिष्ठ निरीक्षक किरण पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ॲड. पठाडे म्हणाले की, गांधीजींनी जगाला दिलेला अहिंसेचा संदेश हा केवळ एक विचार नसून ते जुलमी राजवटीविरुद्ध लढण्याचे सर्वात मोठे नैतिक शस्त्र आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्या पलीकडे जाऊन जगातील अनेक देशांतील मानवी हक्कांच्या चळवळींना याच विचाराने योग्य दिशा दिली. सध्याच्या बदलत्या सामाजिक व जागतिक परिस्थितीत गांधीजींची तत्त्वे अधिक प्रासंगिक ठरत आहेत.
या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय निरीक्षक किरण पवार, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुरणे, जे. बी. अत्तार आणि मोहन माझगावकर आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *