कबनूर प्रतिनिधी /चंदुलाल फकीर
स्वाभिमानी शेतकरी संघटना कबनूर व गावातील शेतकऱ्यांनी मिळून शासनाच्या ऊस एफआरपी परिपत्रकाची झेंडा चौक येथे होळी करून शासनाचा निषेध व्यक्त केला शासनाने उसाची एफआरपी दोन तुकड्यात द्यावे असे परिपत्रक जारी केले आहे ती रद्द होऊन एकच हप्त्यांत संपूर्ण रक्कम मिळाली पाहिजे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना कबनूर व गावातील शेतकरी मिळून त्या परिपत्रकाची होळी ग्रामपंचायत झेंडा चौक येथे केली तसेच शेतकऱ्याला दिवसा दहा तास लाईट द्यावी म्हणून कोल्हापूर येथे चालू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा.खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन शासनाचा निषेध व्यक्त करत असल्याची घोषणा दिली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मिलिंद कोले, महादेव पाटील, सुभाष सुतार, सूजन शिरगुप्पे, देवराज पाटील, पटू पाटील,अजित चौगुले,बाळासाहेब कामत, महेश पाटील, बाळासाहेब मगदूम, सचिन वाकरेकर, धनंजय कोले, सुनील पाटील, अशोक केटकाळे,अल्लू मगदूम, महावीर लिगाडे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.