महाराष्ट्र शासन कृषी विभाग , तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरोळ यांचे वतीने हेक्टरी 125 टन ऊस उत्पादन वाढ अभियान सन 2021-2022 अंतर्गत राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा आज दिनांक 15/03/2022 रोजी आयोजित करणेत आली..
मा. सौ दीपाली संजय परीट ,सभापती पंचायत समिती शिरोळ यांचे हस्ते श्रीफळ वाढवून अभ्यास दौऱ्याची सुरवात करणेत आली.
सदर अभ्यास दौरा साठी तालुक्यातून 100 शेतकरी निवड केली असुन ते इस्लामपूर , आष्टा, येथे भेट देणार आहेत ,सदर अभ्यास दौऱ्यात ऊस तज्ज्ञांचे मार्गदर्शन , उत्कृष्ट प्लॉट ना प्रक्षेत्र भेट चे आयोजन केले आहे..
सदर कार्यक्रमासाठी सभापती सौ.परीट मॅडम यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या , सदर कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी श्री निरंजन देसाई, कृषी पर्यवेक्षक श्री प्रकाश वठारे व शशिकांत कांबळे तसेच कृषी सहाय्यक जयपाल बेरड, सागर भमाणे, कुमार बेरड , रमेश माळगे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते