रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथे होळीच्या कार्यक्रमात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावस येथील नवलाई-पावणाई मंदिर येथे होळी उभी करत असताना कैचीचे नटबोल्ट तुटून हा अपघात झाला. जखमी झालेल्या प्रौढाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवार 18 मार्च रोजी रात्री 11.56 वाजता ही घटना घडली. चंद्रकांत नारायण सलपे (वय 54, राहणार पावस नालेवठार धनगरवाडी, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत संदीप रामचंद्र सलपे यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सलपे हे त्यांच्या गावातील होळी उभी करताना नटबोल्ट अचानक तुटला. त्यामुळे होळी त्यांच्या अंगावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय तपासून मयत घोषित केले. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
दुर्दैवी घटना : पावस येथे होळीचे झाड उभे करताना प्रौढाच्या डोक्यात पडून मृत्यू
