एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महविकास आघाडीसोबत जाण्यासाठी प्रस्ताव दिला, यावरून राजकीय वातावरणात एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करणे सुरु झाले आहे. भाजपने यावरून शिवसेनेला टार्गेट केले आहे. परंतु शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इम्तियाज यांची हि ऑफर नाकारली आहे. यासोबतच आज शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर पलटवार केला आहे. महविकास आघाडीला एमआयएमचा प्रस्ताव हे भाजपचे षडयंत्र आहे, असा थेट आरोपच उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावरून फडणवीसांनी देखील शिवसेनेला टोला लगावत म्हटले आहे कि, एमएम सोबत युती करायचा विचार करणारे तेच हेत, हि त्यांची मिलीजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळत आहेत.
फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले कि, स्पर्धा भरवणारे ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणारे ते, त्यांचेच घटक पक्ष एएमएम सोबत युती करायचा इचार करणार तेच आणि आरोप हि करणार तेच. हि मिलीजुली कुस्ती आहे ते सगळे मिळून खेतायेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना पक्षांतील खासदारांना सम्बोधीत करताना शिवसेना खासदारांना शिवसेनेचे हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवा असे सांगितले. एमआयएमचा कट उधळून लावा, असा आदेशही त्यांनी दिला. मेहबुबा मुफ्ती विसरू नका. एक वेळ अशी होती कि ते मुफ्तीसोबत संसार करत होते. आणि आता ते आपल्याला बोलत आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी हेही अधोरेखित केले कि महविकास आघाडी सोबत आपली युती आहे. आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. महाविकास आघाडीला एमआयएमचा प्रस्ताव हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.