शब्दांचे प्रदेश असे विस्तारतात
शिव शिवालते शिवी

शब्दांचे प्रदेश असे विस्तारतात<br>शिव शिवालते शिवी

शब्दांचे प्रदेश असे विस्तारतात
शिव शिवालते शिवी

शिवाजी राऊत
भाषा राजकारण करते भाषा इतिहास मारते भाषा व्यवस्था उध्वस्त करते भाषा व्यवस्था सोयी न रूप नव्याने निर्माण करते भाषा ज्ञान आणि संस्कृती यांची मोडतोड करते ज्ञान आणि संस्कृती हे निर्माण करण्यात ची साधन अनुभूती भाषा असते म्हणून भाषा ही जनप्रीय असते जनप्रीय भाषा आणि अभिजन प्रिय भाषा आणि इतर जनांची भाषा हे भाषेचे भेद हे भाषेच्या राजकारणाचे व्यापक प्रदेश आहेत भाषा ही संवाद साधत जरी असली तरीही ती प्रभुत्व आणि वर्चस्व शोषण आणि अत्याचार यांचे हत्यार म्हणूनच संवाद विश्वात वावरत असते भाषेचे प्रियजन हे भाषेचे मानकरी व वाहक म्हणून भाषा विश्वाला समृद्ध करीत असल्याचा दावा करतात वस्तुतः भाषेच्या अंतरंगात असे अज्ञात प्रदेश असंख्य आहेत या भाषेच्या अज्ञात प्रदेशात संस्कृतीची दुःखे ठोकून बसवलेले असतात त्यासाठी भाषा नवनवीन अर्थांची समर्थनाची भूमिका घेते आणि भाषिकांना संभ्रमात टाकते भाषा साधन आहे भाषा हे संस्कृतीचे महाभयंकर घातक हत्यार आहे म्हणून भाषेचा अन्वेषणाच्या अंगाने सतत विचार करण्याची अभिवृत्ति प्रत्येक भाषिकांच्या अंतकरणात निर्माण होण्याची नितांत गरज आहे अन्यथा भाषेचे ब्रह्म मायाजाल हेच भाषेचे साम्राज्य म्हणून स्वीकारले जाते आणि अभिजन वाद्यांची प्रभुत्व संस्कृती ही खरी संस्कृती म्हणून स्वीकारण्याची चूक त्या त्या कालखंडामध्ये होत असल्याचे आढळून येते

भाषेच्या अवशेष हि अंवेशना ची सामग्री आहे भाषेतील प्रत्येक शब्द हा मानवी ज्ञानाच्या संचिताचे भांडार आहे शिव शिवा ल आणि शिवी तीन शब्द इथे भाषेच्या अंवेशना साठी घेतले आहेत शिव हे सत्य आहे शिवम हे ज्ञान आहे शिवअस्तित्व आहे शिव हे मांगल्य आहे शिव वर्तमान आहे शिव हे वास्तव आहे शिवही एका वर्गाची वर्णाची संस्कृती आहे शिवही सत्याची जवळ जाण्याची ज्ञानसाधना आहे शिव संस्कृतीचे दर्शन आहे शिव हा सत्याचा संघर्ष आहे सत्य शिवाचे स्वरूप आहे अशा सत्याच्या आणि शिवाच्या असंख्य पातळ्या असंख्य शतकांचे प्रवास स्वरूप हे मानव जातीचे उत्क्रांत वाटचालीचे दर्शन आहे या वाटचालीचे आकलन करून घेणे हे इतिहासात जाणे आहे इतिहास तपासणी आहे शिवं निर्मिती ही मूल्य पूजा आहे शिव प्रतीके ही मूल्य दर्शन रूपे आहेत शिव हे स्त्री आणि पुरुष जीवनाचे संघर्ष व एकात्म साध्य रूप आहे असे जरी असले तरीही शिव हा संघर्ष बनतो तेव्हा इतिहासातील संस्कृतीचे क्रूर रूप पुढे येते शिव क्रोध आहे शिवं नाश आहे शिव ही आराधना आहे शिव सत्याच्या दिशेने व्यक्ती यांनी समाजाने केलेली वाटचाल आहे त्या मूल्य संघर्षाचे प्रतीक रूप म्हणजे शिवरूप होय असे अर्थ भाषेच्या अन्वेषण आतून लावता येतात शिवाचे सत्य रूप हे संघर्ष रूप असते संस्कृती ही नेहमी मूल्य रूपात असते पण एका वर्गाचे आग्रही मूल्य हे जेव्हा पराभूत होते हे जेव्हा पराभूत केले जाते तेव्हा भाषेच्या ब्रह्माच्या जंजाळात शिवाची प्रतीके तयार केली जातात आणि इतर जणांना शिव मूल्य पूजा ऐवजी प्रतीक पूजेच्या भ्रमात अडकवले जाते सत्यम शिवम सुंदरम हे मानवी जातीचे तत्त्वज्ञान एकत्रित करण्याचे भान योग्य वाटते त्यात जीवनध्येय आढळते तो जीवन प्रवास ही ठरतो कारण शिव म्हणजे मांगल्य शिव म्हणजे आनंद शिव म्हणजे शांती शिव म्हणजे समाधान शिव म्हणजे सुख शिव म्हणजे सर्व जिवांचा समान राखलेला आदर असतो अस्तित्वाची मान्यता असते शिवाच्या स्वीकारतूनच सुंदरम तयार होते सुंदरम हेमन शांतीचे उच्च विकसित सौंदर्य स्विकारा चे अस्तित्व रूप असते सुंदरं हे ज्ञानरूप असते सुंदरं हे दृष्टी रूप असते सुंदरम हे आकलन असते सुंदरम हा प्रकृती पुरुषांच्या जीवनाच्या सक्तीचा प्रवास असतो म्हणून शिव हा सुंदरम मध्ये परिवर्तित करण्याचे भान हे मानवी संस्कृतीने कोणत्या टप्प्यावर केले हे जरी कळाले नाही तरी शतकांच्या प्रवासात मानवजातीने शिवा नंतर सुंदरम चा स्वीकार करून प्रवास चालवला आहे हे प्रकृती पुरुषाचे सुंदर नाते आहे सुंदरम हे पुरुषाचे व प्रकृतीचे मिलन आहे सुंदरम हेच जीवनाचे आनंदरूप आहे भावनांचे विकसित आंतरिक समाधान आहे शिवम हे शिवाचे भिन्न भिन्न स्वरूप जरी असले तरीही शिव शिव हा शेव पंथीय धर्म बांधवांचा प्रतीक ईश्वर कधी केव्हा कोणत्या कालखंडात तयार झाला याचे भारतीय सांस्कृतिक इतिहास धागे सुस्पष्टपणे पुढे येत नाहीत शिवतांडव हा क्रोध आहे आक्रोश आहे ईश्वर प्रतीकाचे ते कोपिष्ट वर्तन आहे इथपर्यंतचा सामान्य अर्थ लावता येतो पण शिवाच्या प्रतिमा शिव देवळे त्यासाठीची मंदिर घाटांची रचना ओढे नदी नाले यांच्या काठावर असलेली हजारो मंदिरे आणि डोंगरावर बसवण्यात आलेल्या शिवलिंगाची स्थापना हे सगळेच थक्क करणारे आहे भाषेचा सगळ्या अंवेशना मध्ये शिव या प्रतीकाचे व्यवस्थेचे निर्माण व्यवस्थेचे निर्माण तपासणीची सतत गरज आहे शिव श्रद्धा आहे शिव ही कृपा आहे ते भयमुक्त ठेवण्याचे व जगण्याची प्रार्थना रूप आहे

शिव या प्रतीकांचे प्रकृती पुरुष यांचा द्वैतभाव एकत्रित एकत्रित असल्याने बहुसंख्यांक जनजातींच्या उपासना मार्गात शिवप्रतिष्ठानचे पूजन ही मोठी परंपरा त्यातील शास्त्रीयता त्याचा अन्वयार्थ त्याचा पटन मार्ग हे सर्व त्या त्या पण त्यांना प्रतीत होत असेल संस्कृती एका दिशेने चालणारी गोष्ट नसते स म काला तिल अशा प्रभावी जन मनांना भावणाऱ्या श्रद्धाने उपासना मार्गाशी संघर्षही करते त्यातूनच शिव पंथाची भारतभूमीवरील हजारो वर्षांची परंपरा किती संघर्षाचे अज्ञात प्रदेश आजही बाळगून पुढे आलेली आहे तिचे विश्लेषण तिच्या अन्वेषण तिचे संशोधन भौतिक व्यवस्थेतील स्थान त्यांच्यावरील आक्रमणे या सर्व बाबी अंधार कोठडीतच आहेत म्हणून शिव हे सत्य पण सत्याच्या आधारे शिवाचे कोणते दर्शन घडविले जाते नरसंहार व हिंसा हे प्रतीक भारत भूमीवरील कोट्यावधी जन मनात रुजलेल भय बिज होय
भाषेच्या राजकारणात शिवा लं या शब्दाची निर्मिती स्पृश्य आणि अस्पृश्य या भेदनीती च्या कल्पना टोकाला जेव्हा गेल्या तेव्हा भाषेच्या पातळीवर ती स्पर्श टाळण्यासाठी प्राकृत मराठी मध्ये शिवाल हा शब्द वापरण्यात येऊ लागला केवळ स्पर्श न करणारा शब्द नाही तर तो शूद्रातिशूद्रांच्या छाया दर्शन व सहवास हा जवळ असू नये म्हणून त्यांना दूर हटवण्यासाठी भाषिक पातळीवर वापरलेला आर्य पुरोहितांनी तुच्छतेने दूर हाकलण्यासाठी शिवाल शिवालहा शब्द रूढ केला त्यातूनच शिवाचे शिवाल झाले काय असा प्रश्न भाषेच्या अन्वेषणाच्या पातळीवरची उपस्थित होतो ज्यांचा स्पर्श होईल जन समूहांना दूर लटकण्यासाठी भाषेच्या पातळीवरती जे शब्द वापरण्यात आले असतील ही शिवी असावी का? अशी शंका येते शूद्रातिशूद्रांच्या नामोल्लेख यासाठी आर्य पुरोहितांनी वापरलेल्या आपण शब्दांना भाषेच्या पातळीवर शिवी चे रूप केव्हा प्राप्त झाले असेल? शिवी ही जातीयता अस्पृश्यता बहिष्कृत होता स्त्री-पुरुष नैतिकता या सर्व अंगाने मानवी तुच्छता व्यक्त करण्यासाठी निंदानालस्ती करण्यासाठी भाषिक पातळीवर जेव्हा केव्हा रुड केली गेली असेल तेव्हा भाषेच्या नव आशय व आकलन शब्दांच्या निर्मितीचा नवा प्रदेश तयार झाला असेल पण शिव शिवाल आणि शिवी हाय काय काय शब्दांचा प्रवास हे संस्कृतीचे शतकांचे आक्रमण आणि संघर्ष ग्रुप असते प्रभुत्व वादी अत्याचारी वर्गांनी भाषेच्या वापराचे नवे तयार केलेले हे मार्ग असतात आणि म्हणून भाषेच्या अंतरंगात शब्दांचे अवशेष जेव्हा भेटतात तेव्हा त्या शब्दाची चिकित्सा भाषा संशोधकीय पद्धतीच्या वापरातून सतत केली पाहिजे व त्यातूनच पुढे जायला पाहिजे असेच भाषेचे परिशीलन सांस्कृतिक अंगाने श्रद्धा मूल्य व नैतिकता यांच्या संघर्ष कारणाने याचा शोध घेण्याची नितांत गरज आहे हेच या विश्लेषण मध्ये मांडले आहे

शिवाजी राऊत
प्रेस सातारा 21 मे 22 वेळ 07:40

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *