बहुमतशाही ही विचार स्वातंत्र्या विरोधी असते.” न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

बहुमतशाही ही विचार स्वातंत्र्या विरोधी असते.” न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

“बहुमतशाही ही विचार स्वातंत्र्या विरोधी असते.”

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

वाई दिनांक २७ मे,

“भारतामध्ये बहुमत शाही आहे त्यामध्ये लोक नाहीत लोकप्रतिनिधी हे लोकांचा व मतदार संघाचा विचार करीत नाहीत अशी बहुमतशाही विचार स्वातंत्र्य नाकारते आणि केवळ लोकप्रतिनिधींची शाही बनते आहे याचे कारण लोकांचा परावलंबन वाद व सामाजिक प्रश्नांचे व्यवस्थापन इतरांनी करावे ही उदासीनता कारणीभूत आहे हा परावलंबन वाद भारतीय लोकशाहीला घातक आहे असे विचार न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.”

प्राज्ञपाठशाळा वाई यांचे वतीने आयोजित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित भारतीय लोकशाही व न्याय्य व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष डॉक्टर सरोजा भाटे होत्या, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी म्हणाले की,
तर्कतीर्थ त्यांना महाराष्ट्र जसा विसरू शकत नाही त्याप्रमाणेच गांधीजी आणि नेहरूंच्या शिवाय भारत जगभर ओळखला जाऊ शकत नाही, गांधी आणि नेहरू यांची नावे पुसून टाकण्याची खुमखुमी ज्यांना आहे त्यांनी हे विसरू नये, ज्यां नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी सात वर्षे तुरुंगवास भोगला आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी संस्कृती आणि आधुनिकता यांचे सखोल चिंतन केले आणि भारताचा सांस्कृतिक पाया रचला त्या पंडित नेहरूंचे समर्पण आणि त्याग हे समजावून घेणे इतके ज्ञान भारतीयांच्या अंगी आले पाहिजे, महात्मा गांधींनी नेहरूंची निवड केली होती हे विसरू नये. नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदे मंडळात स्थान दिले होते. जे पंडित नेहरू आंबेडकरांची क्षमा मागतात त्यांची सुसंस्कृतता व वैचारिक क्षमता ही समजावून घेण्याची गरज आहे असे सांगून सत्यरंजन धर्माधिकारी पुढे म्हणाले की जे पंडित नेहरू विनोबांना सतत श्रद्धेय मानत होते त्या विनोबांच्याकडे पुण्या-मुंबई व पश्चिम महाराष्ट्राचे लोक अक्षम्य दुर्लक्ष करतात.
पवनार आणि गागोदे येथे कधीच भेट देत नाहीत , या ठिकाणांना मात्र गांधी आणि नेहरू हे भेट देत होते हे महाराष्ट्राने विसरू नये
भारतीय लोकशाहीतील लोकांच्या उदासीनतेचे बद्दल न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले की,

लोकतंत्र हे विचारतंत्र आहे, विचाराची स्वतंत्रता आहे ही बहुमताची बहुमत शाही नाही, मात्र बहुमत शाही जेव्हा बलिष्ठ होते तेव्हा लोकशाहीतील लोक हरवले जातात आणि बहुमत शाही लोकशाहीचा पराभव करते, यास लोकांची उदासीनता व परावलंबन हे कारणीभूत आहे, उदासीनता व परावलंबन हेच भारतीय लोकशाहीचा घात करतील काय? अशी काळजी व्यक्त करून धर्माधिकारी पुढे म्हणाले की, ज्या लोकशाहीमध्ये लोक मतदान करत नाहीत जे सुट्ट्या साजऱ्या करतात त्या देशातील भौतिक प्रगती म्हणजे आधुनिकता नव्हे, भौतिक प्रगती बरोबर सेवाधर्म हा विचार लोकशाहीतील प्राण आहे त्याचे भान लोकांच्या पासून लोकप्रतिनिधींनी पर्यंत नाहीसे होत चालले आहेत, लोकप्रतिनिधी म्हणजे लोकसेवा धर्म आहे हे विसरता कामा नये, गांधी आणि विनोबांना हा लोक सेवा धर्म म्हणजेच लोकप्रतिनिधी हे अभिप्रेत होते असे सांगून धर्माधिकारी पुढे म्हणाले की, राष्ट्राच्या नियोजनात लोकांचा सतत विचार व्हायला हवा हा विचारच केला जात नसेल तर योजना दिल्लीतून येते आणि कुठे गायब होते हे कळत नाही, पक्षीय शाही मुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे पक्षीय शाही च्या पुढे व्यक्तीशाही हें भारताचे मोठे संकट आहे ,माणूस कितीही मोठा असला तरी तो विचार स्वातंत्र्य जर नाकारत असेल तर तो लोकशाहीचा शत्रुघटक आहे हे लोकांनी विसरता कामा नये असे सांगून धर्माधिकारी म्हणाले की,

लोकशाही ही विचारपद्धती आहे, घरात पक्षात समाजात सर्व ठिकाणी लोकशाही जीवनपद्धतीचा अवलंब करणारा भारतीय समाज हा एकमेकाला न्यायालयात खेचणारा आहे, धमकी देणारा असा समाज चालला आहे कारण नागरिक म्हणून स्वतःची कर्तव्य पार न पाडता स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर भारतीय लोक टाकतात. विस्टन चर्चिल यांचे उदाहरण देऊन धर्माधिकारी पुढे म्हणाले की बिंदुची शक्ती काय होते, आपणच आपलला निर्णय, आपली शक्ती, आपले विचार संघटित न झाल्यामुळे आपले स्वातंत्र्य विकावयास काढले आहे, असे भारतात घडते आहे असे नमूद करून धर्माधिकारी पुढे म्हणाले की,

न्यायव्यवस्थेला विलंबासाठी दोष देणाऱ्या पक्षकारांनी तारखा मागू नये, साक्षीपुरावेला हजर राहावे व विसंबून राहू नये, केवळ न्यायालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर गतीमान न्यायदान होईल या भ्रमात राहू नये.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील न्यायल्यातील न्यायदानाचे व्यवस्थापन एका ठिकाणाहून करण्याची जुनी रीत अयोग्य आहे, ज्या न्यायपालिकेला स्वतःच्या बजेट साठी तिष्ठत राहावे लागते, न्यायपालिका लोकांना ठेवणार नाही का? असा प्रश्न उपस्थित करून,

न्यायमूर्ती धर्माधिकारी पुढे म्हणाले की, आपले संविधान हे प्रदीर्घ चर्चेतून अभ्यासातून तयार झाले आहे, लोक संविधान वाचत नाहीत, त्यावर बोलत नाहीत, मूलभूत अधिकार आणि अनिर्बंध नसतात, सतत लोक जनहित याचिका दाखल करून विकासाच्या प्रश्नांना खीळ घालण्याची मानसिकता ही लोकशाहीला घातक आहे, धर्माधिकारी पुढे म्हणाले की,

विचार स्वातंत्र्य म्हणजे वाट्टेल ते अनिर्बंध अपशब्द बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, हे लोकांनी समजावून घेतले पाहिजे, अभिव्यक्ती ही शिवीशाही नाही,
भारतीय प्रसार माध्यमांच्या भाषेच्या अवनीती बद्दल खेद व्यक्त करून धर्माधिकारी म्हणाले की न्यायालयाने फटकारले असे मथळे माध्यमे वापरतात, न्यायाधीश काठी घेऊन बसलेले नसतात हे विसरता कामा नये.

आज नव्या पिढीला गांधी आणि नेहरू यांचे विचार माहीत नाहीत हा त्यांचा दोष नाही ९० नंतर जन्मलेल्या देशभरातील सर्व तरुण पिढ्या यांना गांधी यांनी नेहरू या विचारांची ओळख करून देण्याची गरज आहे, माध्यमे हे काम करत नाहीत, म्हणून माध्यमातील पत्रकारांची विचार व अभिव्यक्ती ही सुद्धा हिंसक, हिणकस व जुजबी बनते आहे, हे दुर्दैवी आहे ,याला समग्र प्रसारमाध्यमं जबाबदार आहेत, असे सांगून धर्माधिकारी म्हणाले की त्या तरुण युवकांना वार्ता संकलनाचे काम देऊन त्यांचे विचार तरी बिघडू देऊ नका असेही शेवटी त्यांनी सांगितले.

भारतीय न्यायव्यवस्थेत विधी शाखेत तर्काला महत्त्व नव्हते पण नुकतेच भारतीय कायदा ज्ञानशाखेत तर्क हा समाविष्ट करण्यात आला आहे, ही फार मोठी बाब आहे ज्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना अभिवादन करतो आहे, त्यांच्या नावातील तर्क ही न्याय मीमांसा भारतीय विधी शाखेत आता समाविष्ट केली आहे ही फार मोठी समाधानाची बाब आहे, पुढील कालखंडात न्यायाला तारखाचा आधार मिळणार आहे असेही धर्माधिकारी यांनी सांगितले.

एक वेदना व्यक्त करताना न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी म्हणाले की, संगीत ही मानवी जीवनातील उदात्त अभिव्यक्ती आहे, संतूर वादक शहनवाज यांची भारतात किती ठिकाणी श्रद्धांजली झाली! हे पाहून निराशा वाटते, संतूर वादक भारतीय नव्हते का? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की
एकमेकावर कुरघोड्या करणे, एकमेकाचे अस्तित्व नाकारणे, यामुळे दुसऱ्याचे स्वातंत्र्य नाकारून आपण फार मोठा संकुचित वाद जोपासत आहोत स्वातंत्र्य म्हणजे आपले स्वतःचे बोलण्याचे स्वातंत्र्य नव्हे स्वातंत्र्य ही सर्व प्राप्त नागरिकांची मूलभूत गोष्ट आहे हे विसरता कामा नये अशा स्वातंत्र्याचे संरक्षण न्याय पालिकेने सतत करणे हे अभिप्रेत नाही का? जर न्यायालय नसती तर या स्वातंत्र्याचे काय झाले असते? असा विचार करण्याची आता वेळ आली आहे, परावलंबन आतून होत आहे, परावलंबन हा व्यवस्थापन अडसर आहे, लोकांनी आपल्या प्रश्नांचे समस्यांचे व्यवस्थापन व निरसन करायला हवे तरच न्यायव्यवस्थेवरील परावलंबन कमी होऊ शकते, डाव्यांच्या तडजोडी करणे न्यायालयात हजर राहणे, दावे समजावून घेणे, वकिलावर विसंबून राहणे, हे सर्व न्यायदानातील व्यवस्थापनाला अत्यावश्यक आहे, हे लोकांनी समजून घेण्याची गरज आहे फक्त माझा प्रश्न माझी समस्या आणि सार्वजनिकते बद्दलचे अक्षम्य उदासीनता हे भारतीय नागरिकांचे वर्तन परावलंबन आणि लोकशाही वरील विश्वास कमी करणारे आहे हे गंभीरपणे समजावून घेण्याची गरज आहे असे सांगून,
न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले की, परावलंबन आणि उदासीनता हे भारतीय लोकशाही पुढील नागरिकांच्या मानसिकतेकची संकटे आहेत, ती बदलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे नमूद करून आपण धर्माधिकारी कुटुंबाच्या परंपरेतील सामान्य घटक असल्याचे विनम्रपणे नमूद करून तर्कतीर्थ यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यास आपणास पाचारण केले ही गोष्ट आनंदही आहे असेही शेवटी त्यांनी नमूद केले.

पाठशाळेचे सचिव अनिल जोशी यांनी प्रारंभी पाठशाळेच्या कार्याचा इतिहास व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवन कार्याचा आढावा प्रस्ताव विकास घेतला, तसेच माननीय वक्ते धर्माधिकारी यांचा परिचय त्यांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या पाठ शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर सरोजा भाटे यांनी भारतीय संस्कृतीतील व्यवहार कांड अर्थातच ज्ञानमीमांसा ही आपण पाश्चात्त्यांच्या वसाहतवादी विचारामुळे विसरलो आहोत, आपली न्यायदान प्रक्रिया ही व्यवहार खंडाच्या आधारे पुढे जाण्याची गरज आहे, तो इतिहास तो धर्मकोष तयार होत आहे, असे सांगून त्यांनी न्यायमूर्तींच्या तत्व मीमांसा व तर्क शास्त्र आणि न्यायदान यांच्या अभ्यासक्रमातील नवीन समावेशा याबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वात शेवटी संचालक डॉक्टर शंतनु अभ्यंकर यांनी उपस्थितांचे आभार मानले, माणदेशी फाउंडेशनच्या चेतना सिंह किरण सौ कुलकर्णी यांचेसह वाईतील अनेक मान्यवर टिळक ग्रंथालयातील या स्मृती सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते.

विशेष भेट
विनोबा भावे कुटुंबीयांचे कोटेश्वर मंदिर ट्रस्ट वाई या मंदिरास न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी भेट दिली व मंदिर कामाबद्दल सविस्तर चर्चा केली निधी उभारणी व तांत्रिक बाबी यांची माहिती घेतली आणि विनोबांच्या स्मृती जतनासाठी कोटेश्वर मंदिर ट्रस्ट या कामास समाजाने उदार मनाने हातभार लावावा आणि हे काम पूर्णत्वास न्यावे असे मनोगत ही छोटेखानी भाषणात तेथे त्यांनी व्यक्त केले.

तेथे भालचंद्र मोने, शंतनू अभ्यंकर, शिवाजी राऊत, चेतना सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *