हिंदी भाषा साम्राज्य वादातून हिंदीचे ब्राह्मणी संस्कृत करण करणे हे हिंदी हिंदुत्वाचे उद्दिष्ट ?

हिंदी भाषा साम्राज्य वादातून हिंदीचे ब्राह्मणी संस्कृत करण करणे हे हिंदी हिंदुत्वाचे उद्दिष्ट ?

हिंदी भाषा साम्राज्य वादातून हिंदीचे ब्राह्मणी संस्कृत करण करणे हे हिंदी हिंदुत्वाचे उद्दिष्ट ?

जगभर राष्ट्रवादाच्या नव्या संकल्पना रचल्या जात आहेत एक भाषा एक देश एक धर्म एक राष्ट्र राष्ट्रवादाचा संकल्पनांचा प्रवास हा बहुसांस्कृतिक देशांमध्ये स्वीकारताना संस्कृतीच्या कारणांची संघर्ष रूपे पुढे येतात त्यामुळे गोंडस एक भाषा एक राष्ट्र अशी घोषणा देऊन बहुसांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया खिळखिळा करण्यासाठी एक नव व्यूह रचना रचली जाते आहे का? याचा शिक्षण क्षेत्रात गंभीर विचार व्हायला हवा

भारत हा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या दिशेची रणनिती पुढे नेत असताना उत्तर आणि दक्षिण या प्रादेशिक समस्यांच्या मुळे या दोन्हीही उत्तर-दक्षिण प्रादेशिक वादाला संघर्ष रूप एक भाषा एक राष्ट्र या सूत्राने देऊ पाहतो आहे का या प्रश्नाचे उत्तर होय असे मिळते उत्तरेकडील पाच राज्य राजस्थान मध्यप्रदेश बिहार गुजरात दिल्ली यांच्यामधील हिंदीचा संवाद भाषेचा वापर फक्त 53 टक्के आहे ज्या देशांमध्ये संवादाची भाषा म्हणून हिंदी ने खूप सर्वदूर प्रभाव पाडला आहे तेच संवाद भाषेला दक्षिणेकडील राज्य विरोध करीत आहे आहेत हा विरोधाभास अनेक अंगाने समजावून घेणे हे भाषिक साम्राज्यवादाच्या राजकारणाचे अंतरंगाचे स्वरूप स्पष्ट करण्यासारखे आहे भाषिक साम्राज्यवाद ही एकसूत्री भाषा सपाटीकरण करणे आणि मानवी मेंदूतील रचना प्राप्त भाषिक प्रेरणा प्रतिबंधित करणे हि या राजकारणाची रणनीती असते आम्ही आमची वेळ येईल तेव्हा पाहू हे राष्ट्रीय 15 भाषांच्या सूत्राच्या मान्यतेच्या वादात त्यांनी तेव्हा जे उद्गार काढले गेले होते ते उदगार आज 2022 मध्ये खरे ठरत आहे संविधानाच्या परिशिष्ट आठ मध्ये ठरवण्यात आलेल्या त्या त्या राज्यातील 15 भाषा यांना राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्यात जरी आला असला तरीही व 2011 चया जनगणनेत संपूर्ण भारतात 19569 येवढ्या भिन्न समुहांच्या भिन्न बोली भाषा नोंदविल्या गेल्या आहेत त्यांचे सामान्य रूपाने साधर्म्य असलेल्या 1369 भाषिक गटात वर्गीकरण हि करण्यात आले आहे ऐका भाषेच्या गटात आश्या55 बोली भाषांचा समावेश करणे हे वर्तमान कालीन अनेक भाषांच्या जनक अर्थातच उत्तपत्ती ज्याच्या पासून जाहली अश्या भाषांचे अवशेष नष्ट करणे होय भाषांच्या संस्कृतीक राजकारणामध्ये हस्तक्षेप करणे व त्यांचे सांस्कृतिक प्रभुत्व नष्ट करणे हिंदी भाषिक राजकारण करणाऱ्या पक्षांना शक्य झाले नाही आणि म्हणूनच एक भाषा एक राष्ट्र एक धर्म अशा प्रकारची एक सुप्त रणनीती हिंदी भाषेच्या माध्यमातून भारतामध्ये दक्षिण राज यांच्यावर लागण्याचे धोरण पुढे रेटले जात आहे अशावेळी भाषिक साम्राज्यवाद म्हणजेच हिंदी भाषिक राज्यांच्या मधील नागरिकांच्या वर हिंदी भाषा लादून त्यांना दुय्यम भाषिक नागरिकत्व बहाल करणे हा सुप्त हेतू या राजकारणामध्ये आहे हे कधीही न विसरता समजून घेतले पाहिजे तामिळनाडू सारख्या राज्याने हिंदी चा स्वीकार म्हणजे आपल्या संस्कृतीत श्रेष्ठत्वाचे सर्व अधिकार आपण दुसऱ्याच्या हातात देणे आणि संस्कृतीक प्रभुत्व वादाला शरण जाणे होय असे डी एम के चे करुणानिधी यांनी या पूर्वी म्हटले होते शासकीय कारभाराची भाषा म्हणून हिंदीला पुढे आणत असताना संस्कृतिक अजेंडा हा वेगळा आहे हे दक्षिण राज्यांना कळाले आहे हिंदी ही भाषा स्थानिक भाषांच्या संमिश्र शब्दांचा स्वीकार करते आणि भाषेचा संमिश्र वाद अर्थात संकर हा पुढे जातो भारतात मध्ये सर्व भाषांच्या मध्ये हिंदी आणि स्थानिक प्रादेशिक भाषा यांच्या शब्दांचे फ्युजन हे सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे
संवाद भाषा हिंदी च्या शब्दांचा प्रादेशिक स्थानिक भाषांच्या तसेच बोलीभाषांच्या शब्दांवर पडणारा परिणाम आणि त्या शब्दांचा स्वीकार आणि वापर हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे हे संकट भाषा मृत्यू व त्या जन समूहाचे वांशिक मौखिक पारंपरिक वेगळे पण नश्ट करणार आहे सगळेजीवन संकर संमिश्र ता हे जागतिककरणानंतर चे मानवी समूह समोरील कायम आव्हान असणार आहे भाषा प्रमाण राहणे ही तर असंभव गोष्ट आहे यासाठीची भाषिकांची भाषिक अभिवृत्ती आसक्ती व साधना अजिबात नाही त्यामुळे भाषिक संकर हे भाषांच्या प्रदूषित करणाचे मोठे कारण बनले आहे हे संकट आहे की समस्या आहे हे भाषेचे मूळ अस्सल स्वरूप नष्ट होणे आहे आणि भाषा हळूहळू मरणपंथाला लागले आहे असे म्हटले तर ते चूक ठरत नाही भाषेच्या प्रमाणीकरणाचे नुसते प्रयत्न ते पुरेसे ठरत नाही आधुनिक उत्तर काळात भाषा जेव्हा संवाद आला अत्यंत उपयोगी पडते ती सर्वत्र स्वीकारले आणि चालते ची भाषा अर्थकारणाच्या गती साठी सुद्धा उपयोगी पडते तीच भाषा जागतिकीकरणाच्या गदारोळ यामध्ये संस्कृतीचे फ्यूजन भाषेचे फ्युजन असेच स्वरूप म्हणून ते पुढे येत राहील हे भाकीत फार अवघड नाही एक भाषा एक राष्ट्र एक धर्म या दिशेने पुढे चाललेला भाषिक साम्राज्यवादाचा अजेंडा हा या देशातील बहुसंस्कृतिवाद अशा भिन्नभिन्न जनसमूहांच्या वांशिक भाषांचा चे सपाटीकरण करणार आहे त्या भाषा मूठभर असल्या तरीही अशा बोली आणि वांशिक भाषांचे अपमृत्यू हे निश्चित जवळ आले आहेत याचे कारण नाशिक साम्राज्यवादाचा वरवंटा फिरवून संस्कृतीचे वांशिकातेचे सपाटीकरण करण्याचे मनसुबे यामध्ये स्पष्ट होतात

हिंदी भाषेचा साम्राज्यवाद पुढे रेटताना दक्षिण भारतामधून होणारा विरोध हा अनेक प्रकारे समजून घेण्याची गरज आहे भारतीय संघराज्य हे भाषिक तत्वावर वारंवार संघर्षामध्ये अडकलेले आहे हे संघर्ष हिंसेचे स्वरूप धारण करून गेले आहेत वर्तमाना मध्ये सुद्धा हिंदी हिंदुत्वाचा आधारे जर का पुढे रेटला तर हा संघर्ष अटळ आहे त्यांच्या मते संघराज्याचे सहयोगी तत्व आणि संघराज्याचे भाषिक प्रभुत्व वाद हा वाद निर्माण करणारी गोष्ट वारंवार स्पष्ट झाली आहे तरीही केंद्र सरकारने गृहमंत्र्यांनी सध्या अजेंडा म्हणून उत्तर-दक्षिण राज्यांच्या वादासाठी कायम धगधगता राहील असा हिंदी हिंदुत्वाचा मुद्दा हा ऐरणीवर आणला आहे त्याच्या अंतरंग अनेक आहेत ही सर्व रणनीती भारतीय संविधानाच्या मूळच्या च्या विरोधात आहे ती संविधानाच्या पायाला आघात पोहोचविते हिंदीचे दक्षिणा राज्यांनी प्रभुत्व नाकारण्याचे कारण त्यांच्या मते हिंदी अहिंदी दक्षिणेकडील राज्य आणि हिंदी वादी उत्तरेकडील राज्य असा एक भेद तयार करणे ध्रुवीकरण करणे आणि भाषिक तत्त्वावर देश नेहमी धगधगता संघर्षात ठेवणे ही रणनीती हिंदी हिंदुत्वाच्या धोरणाच्या अंतरंगात आहे हे ते जाहीर करतात

हिंदी हिंदुत्वाच्या भाषिक साम्राज्यवादाच्या पोटामध्ये हिंदीचे संस्कृतीकरण अर्थातच हिंदी भाषा देवनागरी तिचे रूपांतर संस्कृत देवनागरी सारखे करणे आणि हिंदी से संस्कृत भाषा रूपांतर पुढे आणणे होय याचे कारण हिंदी संस्कृत भाषा लिपी ही पुढे आणली तर ब्रह्मनिकल संस्कृत हिंदी करण हे प्रभुत्वाचे एक कायम भविष्यातील हत्यार बनेल हा दुष्ट हेतू हिंदी भाषा साम्राज्यवादाच्या राजकारणाच्या अंतरंगात आहे म्हणून थोडक्यात असे म्हणता येते हिंदी दरवाजा उघडते ब्रहमिनिकल संस्कृत बाई आत येते याचा अर्थ असा होतो की या देशातील मूळ इस्लामी राजवटीतून संवाद भाषेच्या स्वरूपात खूप प्रसारित होत जाणारी 53 टक्के लोक ज्या भाषेत बोलतात ती भाषा जर रोखा वयाची असेल तर हिंदीचे ब्रहमिनिकल संस्कृतीकरण केले तर कला साहित्य संस्कृती ज्ञान व्यवहार यांच्यामधील प्रभुत्व हे एका विशिष्ट वांशिक व जातीय गटांचे कायम राहू शकते हा सुप्त हेतू त्यामध्ये असल्याचे निष्कर्ष अनेक भाषिक अभ्यासक या धोरणाबाबत काढत काढत आहेत

या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व व उत्तर काळामध्ये हिंदी राष्ट्रवादाचा खूप विचार केला गेला आहे त्यामध्ये पाश्चात्त्यांच्या एक भाषा एक राष्ट्रवादाच्या सूत्राचा आधार घेत भारतामध्ये हिंदी ही राष्ट्रवादाची आधारभूत भाषा अशी सहमती त्याकाळी झालेली होती एका भाषेचे प्रभुत्व संपूर्ण भिन्न भाषिक राज्यांच्या वर लादणे हा हा भारताच्या एकात्म राष्ट्रवादाच्या पुढील संघर्षाचा मुद्दा कायम राहतो किंबहुना ही विसंगती शिकार इतच भारताचा गेल्या 75 वर्षाचा प्रवास चालू आहे दक्षिणेकडील तामिळ आंध्र ओरिसा केरळ कर्नाटक ही राज्य हिंदी भाषा विरोधी राज्य म्हणून सतत वादग्रस्त ठरले आहेत आणि बहुचर्चित राहिली आहे राष्ट्रभाषा नावाच्या खाली हा वाद पुढे रेटण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते भारतीय संघराज्याला खिळखिळे करणारे ठरू शकतात किंबहुना तो फार मोठा धोका भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे आहे म्हणून प्रादेशिक भाषिकांची भीतीही समजून घेण्याची गरज आहे त्यांना असे वाटते सध्या भारतात असलेल्या भोजपुरी मैथली ब्रिज या भाषांचे आजचे अविष्कृत स्वरूप हे संस्कृतच्या सुधारित लिपीचे व प्रभुत्वाचे ते स्वरूप आहे याच प्रकारे संस्कृत भाषेचे ब्राह्मणी करण अर्थातच हिंदी करण करणे म्हणजे या वरील प्रभुत्व भाषांच्या सारखे श्रेष्ठत्व तयार करणे होय

या देशातील भाषिक एकात्मतेचे धागे हे संमिश्र व मजबूत आहेत शतकांच्या प्रवासात या देशात अनेक लोक आक्रमणे करण्यासाठी व्यापारासाठी धर्म प्रसारासाठी आले आणि त्यांनी आपल्या भाषिक संस्कृतिक संचिताचा ठेवा इथे दिला आहे मुस्लिम आणि हिंदू यांच्या भाषिक एकात्मते मध्ये उर्दू आणि हिंदी च खूप मोठे योगदान आहे उर्दू आणि हिंदी या तत्कालीन मुघल राज्यकर्ते यांच्या भाषा आहेत या कारणाने त्यांचे सपाटीकरण करणे संवाद भाषेतील त्यांचे अस्तित्व नाहीसे करण्याचा डाव रचणे म्हणजेच हिंदीचे ब्राह्मणी संस्कृतीकरण करणे व लिपी आणि भाषा पूर्णतः बदलणे असा तरी डाव नाही ना ? अशीही शंका अनेक भाषातज्ञ या भाषा धोरणाबद्दल व्यक्त करीत आहेत

मुगल राज्यकर्त्यांची भाषा त्यांच्या सैन्यांची भाषा त्यांच्या राजदरबारातील भाषा उर्दू भाषा होती आणि आहे सामान्य भाषिकांची हिंदी भाषा व उर्दू भाषा या दोन पूर्णता वेगळ्या भाषा आहेत या भाषिकांच्या अस्तित्व हे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या एक भाषा एक राष्ट्र निर्माण करते यांच्या राजकारणातील अडसर आहे म्हणून हे भाषिक ध्रुवीकरण हे संघर्षाचे कारण बनवण्यात येत आहे वादग्रस्त प्रश्नांची निर्मिती ही विभाजनाची पूर्वतयारी असते हे प्रश्न आणि विभाजन हे सोबतच असतात हिंदी भाषिक उत्तरेकडील राज्य आणि अहिंदी भाषिक दक्षिणेकडील राज्य यांच्यामध्ये संविधान विरोधी भारत राज्य आणि संघराज्य विरोधी राज्य अशा स्वरूपाचा भाषिक संघर्ष सुप्तपणे पेरण्याचा व विस्पोट करण्याचा प्रयत्न हिंदुराष्ट्र वाद्यांच्या रणनीतीचा भाग आहे हे दक्षिणेकडच्या राज्यांना कळालेले आहे!

सारांश रूपाने सर्व प्रादेशिक भाषा अभ्यासक व वांशिक बोली अभ्यासकानी संवादक समुहानी प्रसारमाध्यमांनी हे समजून घेण्याची गरज आहे की भाषिक अस्मिता आणि राष्ट्रीय एकात्मता हे दोन्ही घटक वरकरणी सामान्य वाटले तरी त्यांच्या अंतरंगात मध्ये भाषिक साम्राज्यवाद हिंदी हिंदुत्व व त्यातून पुढे हिंदीचे ब्राह्मणीकरण व संस्कृत लिपीचे प्रभुत्व लादणे हे यातील भाषा हिंदी हिंदुत्व साम्राज्य वाद या प्रकारे आणण्याची ही सावकाश पाऊले आहे हा एक पुढे रुपांतरीत होणार भाषिक फासिवाद आहे व यातून पुन्हा वांशिक प्रभुत्व या देशांमध्ये कायम प्रस्थापित करणे हे भविष्यातील उद्दिष्ट या हिन्दी हिंदुत्वाचा राजकारणामध्ये आहे हे कधीही विसरता कामा नये

शिवाजी राऊत सातारा
प्रेस 29मे 22

वेळ सात वाजून पाच मिनिटे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *